HW News Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी, शरद पवारांच्या उपस्थितीत महेश कोठे राष्ट्रवादीत

सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आज त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार का यावर प्रश्नचिन्ह होते. मात्र, महेश कोठे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हाती घड्याळ बांधले आहे. महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. मात्र अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली होती. त्यानंतर महेश कोठे यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. विशेष म्हणजे खुद्द शरद पवारांनीच ट्विट करत महेश कोठेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती दिली आहे.

#UddhavThackeray #SharadPawar #MaheshKothe #PurushottamBarde #Shivsena #NCP #Solapur #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivsena-Bjp Alliance Formula 1995 | शिवसेनेचा फॉर्म्युला, भाजप हतबल ?

News Desk

पडळकरांचा शरद पवारांवर वार, अजित पवार आणि अमोल मिटकरींचा पडळकरांवर जबरदस्त प्रहार!

News Desk

‘कोरोनिल’ या खोट्या औषधाच्या विक्रीला महाराष्ट्रात बंदी,अनिल देशमुखांचा रामदेवबाबांना इशारा !

Arati More