HW News Marathi
व्हिडीओ

“संजय राऊत तर रॉकस्टार”,उर्मिला मातोंडकरांकडुन कौतुक

मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पक्ष बांधणीच्या कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर शिवसेनेनं पुन्हा शिव संपर्क अभियान सुरू केलं आहे. शिवसेनेकडून राज्यभर शिव संपर्क अभियान उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या विधानांवरून पलटवार केला. शिवसंपर्क अभिनायानाच्या निमित्ताने उर्मिला मातोंकर पुण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याबद्दल केलेल्या विधानांविषयी विचारण्यात आलं. त्यावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “संजय राऊत हे अनेक लोकांच्या अनेक टीका सहन करून त्यांच्यावर चोरावर मोर करायला भरपूर सक्षम आहेत. त्यावर मी काय बोलू… ते रॉक स्टार आहेत,” असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या.

#urmilamatondkar #sanjayraut #chitrawagh #uddhavthackeray #BJP #shivsena #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘अनिल परब हे उद्धव ठाकरेंचे शकुनी मामा’ – Ravi Rana

News Desk

Bharat Jodo’ यात्रेमुळे Maharashtra काँग्रेसमध्ये नवी ऊर्जा येईल! Vishwajeet Kadam यांना विश्वास

News Desk

पार्थ पवारांचा आमदारकीचा पत्ता ‘या’ कारणांमुळे झाला कट? राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांची खुलासा!

News Desk