शिवसनेचे खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून थोरातांची कुरकुर नाहीच, विखेंची टुरटुर अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली होती. राऊतांनी केलेल्या टीकेला विखेंनी ट्वीट करत “सामनाचा पारदर्शक कारभार पाहता आपण माझं उत्तर छापाल ही अपेक्षा..!,” प्रत्युत्तर दिले आहे. विखे पाटील म्हटले, “आमची बांधिलकी कधी सिल्व्हर ओक, तर कधी मातोश्री अशा अस्वस्थ येरझारा घालत नाही. आमची छाती फाडून पाहिली, तर एका वेळी एकच नेता दिसेल. तुमची फाडून पाहिली तर उद्धव ठाकरे आणि शरद पवार असे दोघेही दिसतील,” अशी टीका त्यांनी राऊतांवर केली आहे.