HW News Marathi
व्हिडीओ

भाजपसोडून पंकजांना कोणीही सहन करणार नाही !, मेटे-मुंडेंमध्ये पुन्हा वादाची ठिणगी

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. ‘सरकारनामा’ला दिलेल्या मुलाखतीत विनायक मेटे यांनी अत्यंत परखड मत मांडत पंकजा मुंडेंवर जोरदार निशाणा साधला आहे. खरंतर पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातला वाद महाराष्ट्राने अनेकदा पाहिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुलाखतीत पंकजांवर टीका करताना मेटे म्हणतात कि, “पंकजा मुंडे या अतिशय हलक्या कानाच्या आहेत. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या काही कथित हितचिंतकांनी त्यांना वास्तविकता जाणवू न देता खोटेनाटे सांगून दिशाभूल करण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळेच स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर माझे पंकजा यांच्याबरोबर माझी राजकीय गणिते जुळली नाहीत. त्यांच्या या स्वभावाचा फटका त्यांना बसला आणि परळी विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला भाजपशिवाय त्यांच्या चुका कोणता पक्ष पोटात घालणार? त्यामुळे त्या भाजप सोडू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

#VinayakMete #PankajaMunde #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #Maharashtra #GopinathMunde #EknathKhadse
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्यांचं पितळ उघडं पडेल…आता जी शिवसेना आहे ती खरी! – Uddhav Thackeray

News Desk

“प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मुख्यमंत्री…!” एकनाथ खडसेंचा टोला

News Desk

“Modi सरकारने देशाच्या तरुणाला खोटी स्वप्नं दाखवून फसवलं”- Nana Patole

News Desk