HW News Marathi
देश / विदेश व्हिडीओ

Watch Video : हत्तींची रुग्णालयातील सफारी एकदा पहाच

मुंबई | तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही रुग्णालयात गेला आहात आणि तिथे तुम्हाला हत्ती दिसेल? पण, पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी लष्करी रुग्णालयात हा चमत्कार पाहायला मिळाला. रुग्ण आणि डॉक्टरांची ही दुर्मिळ चकमक झाली. भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसांता नंदा यांनी बिन्नागुरी येथील आर्मी कॅन्टोन्मेंट रुग्णालयात शिरलेल्या जंगली हत्तींचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये जलपाईगुडी जिल्ह्यातील लष्कराच्या छावणीतील रुग्णालयात हत्ती फिरताना दिसत आहेत. तसं तर रुग्णालयाच्या इमारतीभोवती नेहमीच प्राणी मुक्तपणे फिरताना दिसतात. मात्र या व्हिडिओमध्ये, एक हत्ती चक्क दारातून आत येताना दिसत आहे, त्याचे मोठे शरीर कॉरिडॉरमधील जागा व्यापत आहे. हा हत्ती कॉरिडॉरमध्ये थोडावेळ काहीही हालचाल न करता स्थिर उभा असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे, तर आश्चर्यचकित झालेले रुग्णालयातील कर्मचारी त्याचे फोटो व व्हिडिओ काढत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Bhaskar Jadhav After Joining Shivsena | ‘माझा अंतरात्मा शिवसेनेचा,म्हणून घरवापसी ‘

Arati More

Independence Day 2020 | जाणून घ्या… काय आहे लाल किल्ल्याचा इतिहास

News Desk

देशात बहुसंख्य समाज हा रामाची पुजा करतो | भागवत

swarit