HW News Marathi
व्हिडीओ

Narayan Rane यांंना Arrest करण्याचं प्लॅनिंग Uddhav Thackeray, Ajit Pawar, Anil Parab यांच्यात ठरलं होतं?

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची अटक आणि जामीनानंतर पडद्यामागच्या घडामोडी समोर येत आहेत. नारायण राणेंच्या अटकेसाठी परिवहन मंत्री अनिल परब हे पोलिसांच्या संपर्कात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. आता त्याआधीचा निर्णय म्हणजे राणेंच्या अटकेच्या कारवाईला हिरवा झेंडा कोणी दाखवला, याबाबतची माहिती समोर येतीये .नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याचं वक्तव्य केल्यानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोमवारी रात्रीच फोनाफोनी झाली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी नारायण राणेंवर कारवाई करण्यावर जोर दिला होता. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा नारायण राणेंच्या अटकेबाबत निर्णय झाला. त्यानुसार मंगळवारी 24 ऑगस्टला नारायण राणेंवर अटकेची कारवाई झाली. महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंतिम संमती नंतरच राणेंवर अटकेची कारवाई करण्याचा निर्णय झाला, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे

#NarayanRaneArrest #AjitPawar #AnilParab #uddhavThackeray #shivsena #BJP #mahaVikasaaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“Balasaheb Thackeray यांची Shivsena संपवण्याचा भाजपने घाट रचला” – Jayant Patil

News Desk

बारामती दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी Nirmala Sitharaman कार्यकर्त्यावर भडकल्या; व्हिडिओ व्हायरल

Manasi Devkar

मुंबईत ‘Sunday Street’ला Akshay Kumar आणि गृहमंत्री Dilip Walse Patil यांची उपस्थिती

News Desk