मुसळधार पाऊस आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळं कोकणातील चिपळूण शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. या चिपळूण शहराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल शहरात आले होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलंय. शिवसेना आमदार भास्कर जाधवांनी विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन चांगलंच गाजवलं.. त्यानंतर कालच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील एका घटनेमुळे पुन्हा एकदा भास्कर जाधव चर्चेत आले आहेत.. यावेळी मात्र त्यांच्या उद्दामपणामुळे त्यांना विरोधकांच्या टिकेला सामोरे जावं लागत आहे…. मदत पूरग्रस्त भागात मदतीची याचना करणाऱ्या महिलेशी त्यांनी उद्दामपणे केलेली वागणूक आणि त्यासंदर्भातला व्हीडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चिपळूणमध्ये एक महिला आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत होती. त्यावेळी भास्कर जाधव यांनी या महिलेला दिलेल्या वागणुकीमुळे त्यांच्यावर टीका होते आहे.
#BhaskarJadhav #uddhavthackeray #shivsena #kokan #Konkan
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.