चेन्नई | तामिळनाडुतील अण्णाद्रमुकच्या (एआयएडीएमके) १८ आमदारांना अपात्रतेच्या निर्णया विरोधातील आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज मद्रास उच्च न्यायालयाकडून आज (२५ ऑक्टोबर)ला निकाल दिला आहे. तामिळनाडू विधानसभा अध्यक्षांच्या निर्णय न्यायालयाने कायम ठेवल्याने अण्णाद्रमुकला यांना मोठा धक्का बसला आहे.
18 AIADMK MLAs disqualification case: Madras High Court upholds Tamil Nadu speaker's decision. pic.twitter.com/YkaikZU3NT
— ANI (@ANI) October 25, 2018
एआयएडीएमकेच्या १८ आमदारांनी शशिकला-दीनकरन गटाचे समर्थन केले होते. त्यामुळे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून त्यांना या आमदारांना अपात्र ठरविण्यात आले होते. या निर्णया विरोधात मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तिसरे न्यायमूर्ती सत्यनारायण यांची नियुक्ती केली होती. तब्बल १२ दिवस चाललेल्या सुनावणीनंतर सत्यनारायण यांनी आज निर्णय दिला आहे. या कारवाई विरोधात अपात्र आमदारांनी सप्टेंबर २०१७ मध्ये न्यायालयात ठरविले होते.
It is not a setback for us. This is an experience, we will face the situation. Future course of action will be decided after meeting with the 18 MLAs: TTV Dinakaran on disqualification of 18 AIADMK MLAs upheld by Madras HC pic.twitter.com/yg1K9VDSLb
— ANI (@ANI) October 25, 2018
या निर्णयावर टीव्हीवी दिनकरन यांनी पत्रकारांना सांगितले की, हा आमच्यासाठी एक धडा असून आम्ही यातून अनुभव आला आहे. परिस्थतीला सामोरे जाऊ. भविष्यातील दिशा ठरविण्यासाठी १८ आमदारांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे त्यांनी म्हटले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.