नवी दिल्ली | काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल करारावरुन पुन्हा एकदा मोदी सरकार आणि गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरयांच्यावर आरोपाच्या फैऱ्या झाडल्या आहेत. गोवा सरकारमधील मंत्री विश्वजीत राणे यांची राफेल डीलवरून कथित ऑडिओ क्लिप महिन्याभरापूर्वी काँग्रेसने ट्विटवर पोस्ट केली होती.
या राहुल गांधी यांनी सोमवारी(२८ जानेवारी) पुन्हा एकदा रिट्विट करत दुर्लक्षित झालेल्या मुद्दकडे लोकांचे लक्ष केंद्रकरून मोदी सरकारवर टीकास्र केले आहे. ”विश्वजीत राणे यांची ऑडिओ क्लिप खरी असून मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल करारासंदर्भातील सर्व गोपनीय माहिती आहे. ही ऑडिओ क्लिपसमोर येऊन ३० दिवस झाले आहेत. मात्र याविरोधात अद्यापपर्यंत एफआयआर देखील नोंदवली गेली नाही किंवा चौकशीदेखील करण्यात आली नाही.”
30 days since the Goa Audio Tapes on RAFALE were released. No FIR or enquiry ordered. No action against the Minister either!
It's obvious that the tapes are authentic & that Goa CM, Parrikar, is in possession of explosive RAFALE secrets, that give him power over the PM. https://t.co/sKwwfIj0bM
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 28, 2019
जाणून घ्या काय आहे नेमके प्रकरण
राफेल विमान डीलशी संबंधीत असलेली रिकॉर्डिंग ऑडिओ क्लिप काँग्रेसने २ जानेवारी रोजी समोर आणल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ माजली होती. गोव्याचे भाजप नेता आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यातील संभाषण कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसकडून जारी करण्यात आली होती. गोव्याच्या कॅबिनेटमध्ये राफेल खरेदी डीलसंदर्भात झालेल्या चर्चेचा हवाला देत काँग्रेसने गोव्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासहीत मोदी सरकारवर टीका केली. कथित ऑडिओ क्लिपमध्ये राणेंनी म्हटले की,”राफेलसंदर्भातील सर्व माहिती माझ्या बेडरुममध्ये आहेत. त्यामुळे माझे कोणीही वाकडे करू शकत नाही, असे मनोहर पर्रीकर यांनी या ऑडिओ क्लिममध्ये म्हटले आहे.”
यावरुनच काँग्रेसने पंतप्रधान मोदींवरही पुन्हा निशाणा साधला. पर्रीकरांकडे राफेलची सर्व रहस्ये असल्यानेच मोदी त्यांना घाबरत आहेत का? ,असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला. तसेच राफेलच्या सर्व फाईल्स पर्रीकरांच्या बेडरुममध्ये कशा आल्या आणि का आहेत?, अशी विचारणादेखील काँग्रेसने केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.