गोवा | मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कधीही राफेल करार किंवा राफेल कराराबाबतची कागदपत्रे याबाबत कोणत्याही प्रकारचे वक्तव्य केले नव्हते. काँग्रेसकडून या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करीत काँग्रेसने इतक्या खालच्या पातळीचे राजकारण करू नये, असा इशारा गोव्याचे आरोग्य मंत्री अभिजीत राणे यांनी काँग्रेसला दिला आहे. काँग्रेसकडून राफेल संदर्भात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेऊन अभिजीत राणे यांनी काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत.
Goa Min Vishwajit P Rane: The audio tape is doctored. Congress has stooped to such a low level to doctor a tape to create miscommunication b/w cabinet&CM. Mr Parrikar has never made any reference to Rafale or any documents. Have asked him for a criminal investigation into this. pic.twitter.com/pEA6L1SiTx
— ANI (@ANI) January 2, 2019
राफेल विमान खरेदी करार घोटाळ्याबाबतची सर्व माहिती मनोहर पर्रीकर यांच्या बेडरुममध्ये असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. यासंदर्भातील गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची एक कथित ऑडिओ क्लिप काँग्रेसने प्रसिद्ध केली आहे. ज्या ऑडिओ किल्पमध्ये “राफेलबाबतची सर्व माहिती पर्रीकरांच्या बेडरुममध्ये आहे” असे अभिजीत राणे यांनी सांगितले आहे.
राफेलबाबतच्या या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर, “काँग्रेसने या ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड केल्याचा आरोप करीत या ऑडिओची लॅबटेस्ट करण्यात यावी”, अशी मागणी अभिजीत राणे यांनी केली आहे. “मी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने मला काँग्रेसकडून लक्ष्य करण्यात येत आहे” असा आरोप देखील अभिजीत यांनी यावेळी केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.