HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात ६०.२१ टक्के मतदान

नवी दिल्ली | १७ व्या लोकसभा निवडणुकीचा  सातव्या आणि शेवटचा टप्प्यासाठी देशभरात आज (१९ मे) मतदान पार पडले आहे. देशातील ५४२ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली असून तमिळनाडूमधील एका जागेवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. आता सर्व राजकीय पक्षांना २३ मेच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे. देशभरात शेवटच्या टप्प्यात ५९ मतदार संघांत मतदान पार पडले असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६०.२१ टक्के मतदान झाले आहे.

यात बिहार ४९.९२ टक्के हिमाचल प्रदेश ६६.१८ टक्के,  मध्य प्रदेश ६९.३८ टक्के, पंजाब ५८.८१ टक्के, उत्तर प्रदेश ५४.३७ टक्के, पश्चिम बंगाल ७३.०५ टक्के, झारखंड ७०.५ टक्के,  चंदीगड ६३.५७ टक्के मतदान झाले.

शेवटच्या टप्प्यासाठी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५३.०३ टक्के मतदान

बिहार ४६.७५ टक्के, हिमाचल ५७.४३ टक्के, मध्य प्रदेश ५९.७५ टक्के, पंजाब – ५०.४९ टक्के, उत्तर प्रदेश ४७.२१ टक्के, पश्चिम बंगाल ६४,८७ टक्के, झारखंड ६६.६४ टक्के, चंदीगड ५१.१८ टक्के

दुपारी तीन वाजेपर्यंत ५१.९५ टक्के मतदान

बिहार ४६.६६ टक्के, हिमाचल प्रदेश ४९.४३ टक्के, मध्य प्रदेश ५७.२७ टक्के, पंजाब ४८.१८ टक्के, उत्तर प्रदेश ४६.०७ टक्के, पश्चिम बंगाल ६३.५८ टक्के, झारखंड ६४.८१ टक्के, चंदीगड ५०.२४ टक्के

दुपारी एक वाजेपर्यंत ३९.८५ टक्के मतदान

 

बिहार ३६.२० टक्के, हिमाचल प्रदेश ३४.४७ टक्के, मध्य प्रदेश ४३.८९ टक्के, पंजाब  ३६.६६ टक्के, उत्तर प्रदेश ३६.३७ टक्के,पश्चिम बंगाल ४७.५५ टक्के, झारखंड ५२.८९ टक्के, चंडीगड ३५.६० टक्के

सकाळी ११ पर्यंत सर्वांधिक २४ टक्के मतदान 

बिहार १८.९० टक्के, हिमाचल प्रदेश १६.९५ टक्के, मध्य प्रदेश २०.९५ टक्के, पंजाब १९.६९ टक्के, पश्चिम बंगाल २५.८४ टक्के, उत्तर प्रदेश १८.०५ टक्के, झारखंड २७.७१ टक्के, चंदीगड १८.७० टक्के

 सकाळी ९ पर्यंत १०.४० टक्के मतदान

बिहार १०.६५ टक्के, हिमाचल प्रदेश ३.०१ टक्के, मध्य प्रदेश ११.८५ टक्के, पंजाब  ९.६९ टक्के, उत्तर प्रदेश ८.२९ टक्के,पश्चिम बंगाल १४.२२ टक्के, झारखंड १५.०० टक्के, चंडीगड १०.४० टक्के

Related posts

मतदान करणे हे आपले कर्तव्य, सर्वांनी आपले कर्तव्य बजावण्याची गरज | मोहन भागवत

News Desk

राफेलबाबतच्या निर्णयाचे राम मंदिर कनेक्शन

News Desk

भाजप सरकारच्या काळात महागाईवर नियंत्रण ठेवण्यात यश आले ! 

News Desk