जेव्हा जेव्हा जगाच्या पाठीवर, हिंदुस्थानच्या कोपर्यात हिंदू संकटात आला तेव्हा तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच धावा करण्यात आला. आज पुन्हा देशात हिंदुत्व संकटात आहे. राममंदिराच्या नावे घंटानाद पुन्हा सुरूच झाला आहे. निवडणुकीसाठीची ही बडवेगिरी आहे. शिवसेनाप्रमुख आजही आपल्यात आहेत या आशेवरच हिंदू जिवंत आहे. जिवंत हिंदू हेच बाळासाहेबांच्या विचारांचे दीपस्तंभ! आम्हाला कोणत्याही घंटा ऐकू येत नाहीत. अयोध्येच्या वाटेवर फक्त हिंदुत्वाचा शंख, तुतार्या, विजयी रणवाद्ये आणि शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद! होय, आम्ही पुढे निघालो आहोत. आज बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त सामनाच्या संपादकीय मधून दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व या विषयावर भाष्य करण्यात आले आहे.
देशावर अस्थिरता आणि निराशेचे ढग जमा झाले आहेत. राजकारणी आणि राज्यकर्ते यांच्यावरील जनतेचा विश्वास उडाला आहे व सर्वत्र अंधकार पसरला आहे. अशा वातावरणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आला आहे. देशात अयोध्येतील राममंदिराचा विषय पुन्हा उसळून आला आहे. जसजशा लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तसतसा हिंदुत्वाचा घंटानाद नव्याने सुरू झाला आहे. मला शेंडी-जानवेवाला आणि घंटा बडवणारा हिंदू नकोय, असे शिवसेनाप्रमुख जाहीरपणे सांगत. त्यांची भूमिका परखड होती. कोणत्याही कर्तृत्ववान व्यक्तीचे व्यक्तित्व, कार्य हे वादातीत नसते तर वादग्रस्त असते. बाळासाहेबांचे तसेच होते. त्यांचे व्यक्तित्व इतर नेत्यांपेक्षा वेगळे होते. संघर्ष, वाद टाळण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. त्यांनी वाद ओढवून घेतले ते राष्ट्रीय हितासाठी. निवडणुका जवळ येताच भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा माहौल निर्माण करायचा प्रयत्न चालवला आहे. आधीचे त्यांचे आंदोलन राममंदिराचे नव्हते, तर अयोध्येतील बाबरी मशिदीविरुद्ध होते. आक्रमक बाबराने मंदिर पाडून रामजन्मभूमीवर मशीद बांधली. मशीद पाडल्याशिवाय रामाचे मंदिर कसे बांधणार? त्यासाठी प्रदीर्घ काळ आंदोलन सुरू होते व हेच आंदोलन त्यांना किमान दीडशे वर्षे चालवायचे होते, पण 6 डिसेंबर 1992 च्या आंदोलनात अयोध्येत प्रचंड गर्दी जमा केली. आडवाणी, साध्वी ऋतंबरा, उमा भारती यांच्यासह अनेक नेत्यांनी राणा भीमदेवी भाषणे केली. जनतेच्या मनगटात चैतन्य सळसळत होते. पण नेते उन्हात वितळणार्या गुळासारखी भाषणे करीत दिशाहीनतेचे प्रदर्शन करीत होते. अशा वेळी शिवसैनिकांचा एक जथा गर्दीत पुढे घुसला. बाबरीच्या घुमटावर चढून हातोड्याने तो कलंकच उद्ध्वस्त केला व अयोध्येसह संपूर्ण हिंदुस्थानात विजयी जल्लोष झाला. हा जल्लोष सुरू असताना सर्व हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी बाबरी उद्ध्वस्त झाल्याची जबाबदारी नाकारली. ‘छे, हे हिंदुत्वाचे राष्ट्रीय कार्य आमचे नाही. ते शिवसेनेचेच काम असेल!’ असे सांगत बाबरी तुटली हा जणू मोठा अपराध घडला व
राष्ट्रीय चारित्र्याला कलंक
लागला अशा पद्धतीने शिवसेनेला आरोपीच्या पिंजर्यात उभे केले, पण त्याच पिंजर्यात उभे राहून शिवसेनाप्रमुख त्यावेळी कडाडले, ‘होय, जर बाबरी पाडणारे माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमानच नाही, गर्व आहे.’ वीज कडाडावी अशी ही हिंदू वाणी होताच मरगळलेले हिंदू मन-मनगट जागे झाले ते आजही तसेच सळसळते आहे. बाबरीचा कलंक मिटवून त्याची जबाबदारी स्वीकारणार्या बाळासाहेबांनी त्या क्षणी अत्यंत धीराचे विधान केले व त्या भाष्याच्या विजा आजही कडाडत आहेत. बाबरी तुटली व त्या ढिगार्यावर आज जे छोटे राममंदिर उभे आहे ते फक्त शिवसेनाप्रमुखांमुळेच; पण पंचवीस वर्षांनंतरही अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहिलेले नाही. जणू ते राहूच नये व मंदिराचे आंदोलन पुढची दीडशे वर्षे सुरूच राहावे अशीच राजकीय योजना दिसते. आधी बाबरी तुटू नये असे ज्यांना वाटत होते त्यांनाच राममंदिर होऊ नये असे वाटते. पण बाबरी शिवसैनिकांनी तोडलीच व आता अयोध्येत राममंदिर व्हावे, मोदी सरकारने ते करावे यासाठी आम्ही अयोध्येकडे निघालो आहोत. बाळासाहेबांचा स्मृतिदिन याच मंतरलेल्या वातावरणात आला आहे. शिवसेनेच्या मार्गात अडचणींचे डोंगर असतील तर ते आपण ओलांडले की आपल्या कार्याची स्मारके त्या डोंगरांमधील दगडांनीच बनणार आहेत हा विश्वास बाळासाहेबांचा होता व तोच आत्मविश्वास त्यांनी लाखो शिवसैनिकांत भिनवला. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना पुढे हिंदू हक्क रक्षक बनली. म्हणजे तुम्ही मराठी अस्मितेची लढाई सोडली का, की राष्ट्रीय राजकारणाच्या प्रवाहात तुम्ही पतित झालात असे निरर्थक प्रश्न बाळासाहेबांना नेहमीच विचारण्यात आले, पण रामदास स्वामींना ‘भूमंडळ’ दिसत असतानासुद्धा मराठा तितुका मेळवावा हे दिसत होते. महाराष्ट्राच्या भूमीवर शिवरायांनी राज्य निर्माण केले ते हिंदवी स्वराज्य. म्हणून महाराष्ट्राने हिंदुत्वाचे खङ्ग म्हणूनच कर्तव्य बजावले. जेव्हा जेव्हा
हिंदुत्व आणि हिंदू संकटात
आला तेव्हा महाराष्ट्राकडेच आशेने पाहिले गेले. स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत महाराष्ट्राच्या ज्वलंत प्रखर हिंदुत्वानेच देश उजळून टाकला. जेव्हा जेव्हा जगाच्या पाठीवर, हिंदुस्थानच्या कोपर्यात हिंदू संकटात आला तेव्हा तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाच धावा करण्यात आला. कश्मीरात अमरनाथ यात्रा, वैष्णो देवीची यात्रा अतिरेक्यांनी बंदुकीच्या नळीवर रोखली तेव्हा हजला जाणारे एकही विमान मुंबईतून उडू देणार नाही असा अणुबॉम्ब शिवसेनाप्रमुखांनी फोडला व हिंदूंच्या यात्रा सुरळीत पार पडल्या. मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात पहिला आवाज जाहीरपणे उठवला तो शिवसेनाप्रमुखांनीच. या देशात राहायचे असेल तर वंदे मातरम् म्हणावेच लागेल, नाहीतर पाकिस्तानात चालते व्हा अशी लाथ घालणारेही फक्त शिवसेनाप्रमुखच. ते हिंदुहृदयसम्राट होते, पण त्यांनी कोणत्याही धर्माचा द्वेष केला नाही. देशद्रोहाला जात-धर्म नसतो हेच त्यांचे मत होते. त्यांनी मंदिरात जाऊन घंटा बडवल्या नाहीत. पण 1992 च्या दंगलीत मंदिरांसमोरच्या ‘महाआरती’च्या गजराने देश रोमांचित करण्याचे काम तेव्हा शिवसेनाप्रमुखांनीच केले. ‘सौ सुनार की एक लोहार की’ हाच त्यांचा खाक्या राहिला. आज पुन्हा देशात हिंदुत्व संकटात आहे. राममंदिराच्या नावे घंटानाद पुन्हा सुरूच झाला आहे. निवडणुकीसाठीची ही
आहेत या आशेवरच हिंदू जिवंत आहे. जिवंत हिंदू हेच बाळासाहेबांच्या विचारांचे दीपस्तंभ! आम्हाला कोणत्याही घंटा ऐकू येत नाहीत. अयोध्येच्या वाटेवर फक्त हिंदुत्वाचा शंख, तुतार्या, विजयी रणवाद्ये आणि शिवसेनाप्रमुखांचा आशीर्वाद! होय, आम्ही पुढे निघालो आहोत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.