HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

उद्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात तिकीट वाटपासंदर्भात दिग्गज नेत्यांची बैठक

मुंबई | काँग्रेस तीन दिग्गज नेते उद्या (३० मार्च) मुंबई येणार आहेत. मुंबई काँग्रेस कार्यालयता त्यांची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या तिकीट वाटपावरून जो गोंधळ निर्माण झाला. याबाबत दखल घेत बैठक बोलविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस झालेल्या डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीहून संघटन सचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, केंद्रीय निवडणूक निरीक्षक मधुसूदन मिस्त्री यांचे शिष्टमंडळ मुंबईत येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या तिकीट वाटपात झालेल्या गोंधळाची गंभीर दखल हायकमांडकडून घेण्यात आली आहे. यामुळे काँग्रेसने डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीहून तीन महत्त्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ मुंबईत उद्या दाखल होणार आहे. मुंबईतल्या काँग्रेस कार्यालयात उद्या सकाळी दहा वाजता या शिष्टमंडळसोबत बैठक होणार आहे.

देशात महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, ज्या ठिकाणी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिकीट वाटप आणि इतर विषयावरुन जो गोंधळ निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर परिस्थिती ती सावरण्यासाठी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी शिष्टमंडळ पाठवण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.

Related posts

भाजप नेत्याच्या घरातून १७ देशीबॉम्ब तर ११६ जिवंत काडतुसे जप्त

News Desk

भाजपाचा सभात्याग, कुमारस्वामींचे विधानसभेत बहुमत सिद्ध 

News Desk

‘युती झाली नाही तरीही लोकसभेला भाजपसोबत’

News Desk