HW News Marathi
राजकारण

#Vidhansabha2019 |अखेर शिवसेनेकडून रश्मी बागल यांना एबी फॉर्म

मुंबई | आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर, सोमवारी (१ ऑक्टोबर) भाजपपाठोपाठ शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली. मात्र, या यादीत करमाळ्याच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांचे नाव नसल्याने त्या पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागला आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्याला एबी फॉर्म देण्यात आल्याची माहिती स्वतः रश्मी बागल यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर विश्वास ठेऊन करमाळा-माढा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी संधी दिली आहे. पक्षाकडून आपल्याला एबी फॉर्म मिळाला आहे.आपण ४ तारखेला ११ वाजता उमेदवारीचा अर्ज भरणार आहोत”, असे रश्मी बागल यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. “करमाळा-माढ्याचा सर्वांगीण विकास करण्यास माझे हात बळकट करण्यासाठी व पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तुम्हा सर्वांची साथ आणि पाठींबा हवा आहे”, असे आवाहनही रश्मी बागल यांनी आपल्या पोस्टद्वारे केली आहे.

शिवसेनेच्या विद्यमान आमदाराची भूमिका काय असणार ?

करमाळा-माढा मतदारसंघात सध्या नारायण पाटील हे शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, आता आगामी विधानसभेकरिता विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून शिवसेनेकडून राष्ट्रवादीतून शिवसेनेत आपल्या रश्मी बागल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. “पक्षाने रश्मी बागल यांना उमेदवारी दिली तर मी गप्प बसणार नाही आणि मला उमेदवारी दिली तर रश्मी बागल गप्प बसणार नाहीत ही वस्तुथिती आहे”, असे वक्तव्य नारायण पाटील यांनी त्यांच्या सोलापूरमधील मेळाव्यात बोलताना केले होते. याच पार्श्वभूमीवर आता नारायण पाटील यांची प्रतिक्रिया काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

आज भगवे वस्त्र नेसून बलात्कार केले जातायत, दिग्विजयसिंहांचे वादग्रस्त विधान

News Desk

अशोक गेहलोत यांनी घेतली राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

News Desk