HW News Marathi
राजकारण

अब्दुल सत्तार गद्दार, चंद्रकांत खैरेंची घणाघाती टीका

मुंबई | “अब्दुल सत्तार गद्दार आहेत. त्यांची गद्दारी सहन करणार नाही. सत्तारांमुळे औरंगाबाद जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष झाला”, अशी अत्यंत तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. शिवसेना आमदार अब्दुल सत्तर यांनी खातेवाटपाआधीच आपल्या राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त आज (४ जानेवारी) सकाळी समोर आले होते. सत्तारांचा राजीनामा हा महाविकासाआघाडी सरकारसाठी मोठा धक्का मानला जात होता. या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, स्वतः शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी सत्तारांची मनधरणी देखील केली. मात्र, आता चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना घरचा आहेर दिला आहे.

“सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा का दिला त्याबाबत मला माहिती नाही. मात्र, सत्तार माझ्याशी जे बोलले ते भयानक आहे. ते मला काय बोलले ते मी तुम्हाला नंतर सांगेन. अब्दुल सत्तार गद्दार आहेत. मात्र, आम्ही ते सहन करणार नाही. आमच्या नेत्यांबाबत कोणीही काहीही बोलले तर ते आम्हाला चालणार नाही”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्यामुळे, औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या पार्श्वभूमीवर आता चंद्रकांत खैरे आणि अब्दुल सत्तार यांच्यातील वाद मोठा होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे, आता शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तारांबाबत कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सत्तार यांना मातोश्रीची पायरी देखील चढू देऊ नये !

अब्दुल सत्तार यांच्या राज्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याचे वृत्त आल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी सत्तारांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अर्जुन खोतकर असेही म्हणाले कि, “अब्दुल सत्तार यांनी कोणताही राजीनामा दिलेला नाही. त्यांची नाराजी दूर झालेली आहे. उद्या सत्तार हे मातोश्रीवर जातील.” मात्र, “अब्दुल सत्तार गद्दार आहेत. त्यांची गद्दारी सहन करणार नाही. अब्दुल सत्तार यांना मातोश्रीची पायरी देखील चढू देऊ नये”, अशी तीव्र प्रतिक्रिया चंद्रकांत खैरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई कोस्टल रोडचे उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमीपूजन

News Desk

अजित पवारांच्या बंगल्यावर ‘मविआ’ची बैठक सुरू; उद्धव ठाकरेंसह महत्वाचे नेते बैठकीला हजर

Aprna

सभेतील कमी गर्दीने मोदींचा तापलेला माथा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली !

News Desk