HW News Marathi
राजकारण

अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठविली अब्रुनुकसानीची नोटीस

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली आहे. पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी (१५ मे) डायमंड हार्बर येथे झालेल्या प्रचारसभेत केलेल्या आरोपांप्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वाद शिगेला पेटलेला आहे.

एकीकडे कोलकाता येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोडशो दरम्यान पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपमधील संघर्षाने अत्यंत आक्रमक आणि हिंसक वळण घेतले. या दोन पक्षांतील संघाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये १ दिवसपूर्वीच प्रचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले. दरम्यान, अभिषेक बॅनर्जी यांनी मोदींना पाठविलेली नोटीस मोदींच्या अडचणीत वाढ करणारी ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री फडणवीस स्वर्गीय वसंतराव नाईक यांचाही रेकॉर्ड तोडतील !

News Desk

राज्यात पुन्हा स्थिर सरकार आणायचे असेल, तर देवेंद्र फडणवीसांना पुन्हा निवडून द्या !

News Desk

“एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून…”, सदा सरवणकरांचा शिवसेनेवर आरोप

Aprna