HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

ठाकरे गटाच्या ‘या’ आमदाराला एसीबीने पाठविली नोटीस

मुंबई | ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना एसीबीने नोटीस पाठविली आहे. नितीन देशमुखांना येत्या 17 जानेवारी रोजी एसीबीने (ACB) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदाराला एसीबीने नोटीस पाठविली आहे. यापूर्वी एसीबीने राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ मालवणचे वैभव नाईक यांना नोटीस पाठविली होती.

“मी एनसीबीच्या चौकशीसाठी हजर राहणार आहे. परंतु, माझ्याविरोधात तक्रार देणाऱ्यांचे नोटीसमध्ये नाव नाही. एखाद्या आमदाराला नोटीस पाठवताना कुणी तक्रार केली आहे. त्याचे उल्लेख असावे. परंतु, नोटीसमध्ये माझ्यावर तक्रार करणाऱ्यांचा उल्लेख नव्हता. आणि माझ्याकडे कोणती अवैध संपत्ती आहे. या गोष्टी ही नोटीसमध्ये नमुद केलेल नाही. मी 17 तारखेला अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती देईल”, अशी माहिती नितीन देशमुख यांनी एबीपीला दिलेल्या माहिती म्हणाले आहेत.

नितीन देशमुख यांचा अल्प परिचय

अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील नितीन देशमुख आमदार आहेत. नितीन देशमुख यांना शिवसेनेचे आमदार आहे. नितीन देशमुख हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील निकटवर्तीय असल्याची माहिती माध्यमातून मिळालीआहे. शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंड पुकारला होता. तेव्हा नितीन देशमुख हे देखील शिंदे गटासोबत सुरतला गेले होते. यानंतर नितीन देशमुख यांच्या पत्नीने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात केली होती. यानंतर नितीन देशमुख यांनी तब्याती खराब झाल्यामुळे त्यांना सुरतच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर नितीन देशमुख हे गुवाहाटीला पोहोचले होते. परंतु, नितीन देशमुख हे काही कारणाने खासगी विमानाने महाराष्ट्रात परतले. आणि हे विमान एकनाथ शिंदेंनी त्यांना दिले होते, अशी माहिती नितीन देशमुखांनी महाराष्ट्रात आल्यानंतर सांगितले. आणि नितीन देशमुख हे पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

किरीट सोमय्यांचं थेट साताऱ्यात जाऊन अजित पवारांना आव्हान; म्हणाले, “हिंमत असेल तर….

News Desk

‘महाराष्ट्राच्या राजकारणात संघर्षाची स्थिती, आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय’, शरद पवारांनी व्यक्त केला संताप

News Desk

जदयुच्या एका आमदाराचा राजीनामा

News Desk