HW Marathi
राजकारण

उर्मिला मातोंडकर यांनी केला काँग्रेसला राम राम

मुंबई |  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिली आहे. लोकसभा निवडणुकीत उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उत्तर मुंबई मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, उर्मिला मातोंडकर यांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्याचे म्हणत उर्मिला मातोंडकर यांनी मुंबई काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार देखील केली. या पार्श्वभामीवर उर्मिला या आता काँग्रेस पक्षातून बाहेर पडणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मला पक्षांतर्गत राजकारणात कोणताही रस नाही. त्या राजकारणात माझा वापर होऊ नये. त्यामुळेच मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे मातोंडकर म्हणाल्या. ‘काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी मी मिलिंद देवरा यांच्याकडे पत्रातून केल्या होत्या. ते पत्र गोपनीय राहणे आवश्यक होते. मात्र ते पत्र प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात आले. यानंतरही अनेकदा मी नाराजी व्यक्त केली. परंतु पक्षाकडून कोणतीही दखल घेण्याचत आली नाही, मातोंडकर यांनी पक्षांतर्गत राजकाणावर निशाणा साधत राजीनामा दिला. उर्मिलाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याशी लढत दिली होती.  शेट्टींना ७ लाख ६ हजार तर उर्मिलाला २ लाख ४१ हजार मते मिळाली.

 

 

 

Related posts

काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही !

News Desk

ईव्हीएमविरोधात राज ठाकरे आज घेणार पत्रकार परिषद

News Desk

राज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न !

News Desk