HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

तब्बल ४ वर्षांनंतरही परळी-धायगुडा राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था कायम

परळी | तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान परळी मरदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विधानसभेच्या प्रचारादरम्यान एच.डब्ल्यू.मराठीशी बोलताना एका रस्त्याबाबत वक्तव्य केले होते. तो रस्ता नेमका कोणता ? तो रस्ता आहे पूर्वीचा राज्य महामार्ग क्र.64 आणि आताचा 548 – ब राष्ट्रीय महामार्ग परळी – पिंपळा (धायगुडा). या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन आता तब्बल ४ वर्ष उलटून गेलीयेत. परळीच्या तत्कालीन आमदार पंकजा मुंडे यांनी या राज्य महामार्गाचा राष्ट्रीय महामार्ग होण्याबाबत २ मे २०१६ रोजी एक फेसबुक पोस्टदेखील लिहिली होती. जून २०१६ रोजी या रस्त्याचे टेंडरसुद्धा पास झाले होते. मात्र, आता २०२० मध्ये या रस्त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. २४ महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र, तब्बल १३४ कोटी ४५ लाख खर्च असलेल्या या १८.३ किमीच्या रस्त्याचं काम अजूनही झालेले नाही.

जून २०१६ रोजी या रस्त्याचं टेंडर निघाल्यानंतर सप्टेंबर २०१७ मध्ये दोन्ही बाजूने या रस्ता खोदून ठेवण्यात आला. आता २०२० उजाडलंय, अद्याप या रस्त्याचं काम झालेलं नाही. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींनी याच रस्त्याचे उदघाटन केले होते. आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गडकरींवरच या रस्त्याच काम न झाल्याने माफी मागण्याची नामुष्की ओढवली होती. पंकजा मुंडे यांनी देखील कोणत्याही पद्धतीचा पाठपुरावा न करता या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांच्यावर वारंवार झाला. याच रस्त्याच्या मुद्यावरून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचाही पराभव झाल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. हा रस्ता दोन्ही बाजूने पूर्ण उखडून ठेवल्यान, मुख्य कंत्राटदाराने कामाकडे दुर्लक्ष केल्यानं, तसेच स्थानिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे या रस्त्याचे काम आतापर्यंत रखडल्याचे इथल्या स्थानिकांच म्हणणं आहे. इतकंच नव्हे तर रस्त्याच्या अर्धवट रखडलेल्या कामविरुद्ध कृती समिती स्थापन होण्याची पहिलीच वेळ याच रस्त्याच्या निमित्ताने आली.

धनंजय मुंडे तरी या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करतील ?

परभणी लातूर अशा महत्त्वपूर्ण गावांना जोडणारा हा रस्ता इथल्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अंबाजोगाईत शिक्षणासाठी जा-ये करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे असल्याने या रस्त्याला मोठे महत्व आहे. मात्र, या रस्त्याच्या दुरास्वस्थेमुळे एसटी महामंडळाने आपल्या अनेक फेऱ्या रद्द केल्या आहेत. आत्तापर्यंत या रस्त्यावर शेकडो दुचाकीचे त्यांच्याप्रमाणे अन्य वाहनांचे देखील अपघात झालेले आहेत. इथे रोज अप-डाऊन करणारे लोक आणि या विद्यार्थ्यांना आता या रस्त्याच्या दुरास्वस्थेमुळे मोठ्या गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. राज्यात आता महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास २ महिने पूर्ण होत आले आहेत. आता मंत्रिपदाचं वाटपही झालंय आणि जवळपास प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा निश्चित झालेत. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत याच रस्त्यावरून पंकजा मुंडे यांच्यावर ताशेरे ओढणाऱ्या धनंजय मुंडे तरी आता या रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा करतील आणि रस्ता लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

Related posts

भाजपला वीर सावरकरांचा आलेला पुळका खोटा, सामनातून टीका

News Desk

दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवत आहेत, भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याची टीका अन् निलंबन

News Desk

…आता मराठा बांधवांनीही मुस्लिमांच्या आरक्षणासाठी पाठिंबा द्यावा !

News Desk