HW Marathi
राजकारण

फैजाबादनंतर आता अहमदाबादचे नामांतर ‘कर्णावती’ होणार का?

अहमदाबाद | उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिवाळीच्या निमित्ताने फैजा बादचे नाव बदलून अयोध्या असे केले. याआधी गोयी यांनी अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केले आहे. उत्तर प्रदेशाच्या पाठोपाठ आता गुजरातमध्ये देखील नामांतराच्ये राजकारण पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये अहमदाबाद जिल्ह्याचे नाव बदलून ‘कर्णावती’  करण्याची मागणी सत्ताधारी करत असून नामांतराच्या हालचालींना जोर आला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अहमदाबादचे नाव बदलून  ‘कर्णावती’ करण्याचा विचार सुरू होता. आम्ही कायदेशीररित्या अहमदाबादचे नाव बदलणार असून नामांतर करून आम्ही एक पायंडा रचण्याचा विचार करत असल्याचे गुजराचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगतले. तसेच अहमदाबादचे नाव बदलून कर्णावती मागचे कारण म्हणजे  इ. स. १४११ साली सुलतान शाह याने कर्णावती शहराचे नाव बदलून अहमदाबाद केल्याची नोंद आहे. ११ व्या शतकापासून साबरमती नदीकाठावरील अहमदाबादमध्ये नागरीकरणास प्रारंभ झाला.

उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये जिल्ह्याच्या नामांतर पाठोपाठ आता महाराष्ट्रमध्ये देखील जिल्ह्याच्या नामांतराची मागणी होऊ लागली आहे. आता महाष्ट्रात औरंगाबादचे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशीव या जिल्ह्याचे नामांतर करण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणारे ट्विट शिवसेनेच खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

 

 

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलट जबाबदार

News Desk

पंकजा मुंडेंनी आपले वचन मोडले ?

News Desk

नगरमध्ये सुजय विखेंविरोधात राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप यांना उमेदवारी

News Desk