HW News Marathi
राजकारण

इंधन दर कपातीनंतर अरुण जेटलींचे विरोधकांना प्रत्युत्तर

नवी दिल्ली | काही दिवसात दिवसात इंधनाच्या किंमतींमध्ये दर दिवशी वाढ होत होती. त्यामुळे विरोधी पक्षांकडून वारंवार टीका होत होती. काँग्रेसने तर भाजप सरकारच्या काळात सातत्याने वाढणाऱ्या महागाई विरोधात काँग्रेससह इतर २१ पक्षांनी १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाकही दिली होती. अखेर गुरुवारी (४ ऑक्‍टोबर) केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून इंधनाच्या उत्‍पादन शुल्‍कात प्रतिलिटर दीड रूपयांनी कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता मात्र अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले अर्थमंत्री अरुण जेटली ?

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया दिवसेंदिवस घसरल्याने, कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने देशातील इंधनाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. याबाबतच माहिती देताना अरुण जेटली म्हणाले आहेत कि, “व्हेनेझुएला आणि लिबियातील राजकीय संकटामुळे या देशातील तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून अमेरिकेने इराणवर लादलेल्या व्यापारी निर्बंधांमुळे तेलाच्या पुरवठ्यामधील निश्चितता कमी झाली आहे. यामुळे इंधनाच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे.” त्याचप्रमाणे “तेलाच्या वाढत्या किमतींचा फायदा उठवत सर्वच विरोधी पक्षांनी सरकारवर वारंवार टीका केली. मात्र आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाल्यानंतर सर्व विरोधी पक्षांनी मौन बाळगले आहे.” असेही अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

देशासह राज्‍यात देखील पेट्रोल ५ रुपयांनी स्‍वस्‍त होणार असल्याची देखील घोषणा करण्यात आली होती. मात्र या घोषणेच्या प्रत्‍यक्ष अंमलबजावणीत पेट्रोलच्या किंमतीतील कपात ही केवळ ४ रूपये ३५ पैसे एवढीच झाली असल्याचे लक्षात आले आहे. “आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींतील वाढीमुळे निर्माण झालेले दरवाढीचे आव्हान विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सोशल मीडियावरून होणाऱ्या टीकेमुळे कमी होणार नाही,” असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Related posts

मनसेने ईडीला उद्देशून केलेले ट्वीट ‘डिलीट’

News Desk

मोदींच्या समस्या वाढविण्यासाठी निवडणूक लढवणारे प्रवीण तोगडीया

News Desk

#LokSabhaElections2019 : काँग्रेस आज महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार

News Desk
महाराष्ट्र

अर्नाळामध्ये सापडला टाईम बॉम्ब

swarit

विरार | अर्नाळा येथे टाईम बॉम्ब बनविणाऱ्या वस्तू सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. बॉम्ब बनविणारे साहित्य फेक्ट्रिपाडा येथील एका कचरा पेटीमध्ये १० जिलेटिनच्या कांड्या आणि टाइमर अशी बॉम्ब बनविणारे साहित्य पोलिसांना मिळाले आहे.

अर्नाळा ग्रामपंचायतीतर्फे गावात सकाळी ९.३०च्या सुमारास स्वच्छता सुरू असताना कचरा उचलण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना हा बॉम्ब सापडला. या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाने हा बॉम्ब सुरक्षित जागी रेती व सिमेंटच्या रिंगणात ठेवण्यात आला असून बॉम्ब निकामी केला जात आहे.

Related posts

शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी घेतली बाळासाहेब थोरात भेट, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच नाराजी दूर ?

News Desk

ऊसतोड मजुरांकडील गोवंशीय पशुधनाचे लम्पी रोग प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक

Aprna

राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का?, भाजपचा सवाल   

News Desk