नवी दिल्ली | कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजन विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (८ ऑगस्ट) पहिल्यांदा देशातील जनतेला संबोधित केले आहे. मोदी आज सायंकाळी ४ वाजता रेडिओच्या माध्यमातून देशातील जनतेला संबोधित करणार आहे. यामध्ये मोदी काश्मीरबद्दल नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Prime Minister Narendra Modi will address the nation in a special broadcast by All India Radio at 4 pm today pic.twitter.com/FnqKjDuvaQ
— ANI (@ANI) August 8, 2019
सरकाराने कलम ३७० हटविल्यानंतर जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करणार आहे. यानुसार जम्मू-काश्मीरला लडाखपासून वेगळे केले असून दोन्ही देशांना केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. परंतु लडाखमध्ये विधानसभेची स्थापन करण्यात आलेली नाही. जम्मू-काश्मीरला वेगळ्या केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर राज्यात विधानसभा अस्तित्वात राहणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.