HW Marathi
राजकारण

कार्यकर्त्यांचा आग्रह, शरद पवार निवडणूक लढविणार का ?

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याची जोरदार राजकीय वर्तुळात चर्चा रंगायला सुरु झाली आहे. पुण्यातील बारामती वसतीगृहामध्ये राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची आज (८ फेब्रुवारी) बैठक सुरू आहे. या बैठकीला खुद्द शरद पवारही उपस्थित आहेत. शरद पवार यांनी माढातून निवडणूक लढवावी, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली असल्याची माहिती सूंत्राकडून मिळाली आहे.

बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहीते पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ उपस्थित आहेत. दरम्यान पत्ता कट होत असल्यामुळे मोहीते पाटील समर्थक नाराज झाले असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच शरद पवार निवडणूक लढवणार नाहीत, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे. या बैठकीला उपस्थित असलेले पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाड म्हणाले की, पवारांनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. परंतु, शरद पवार हे माढ्यातून निवडणूक लढवतील असे वाटत नाही.

Related posts

गिरीश बापट यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली | उच्च न्यायालय

News Desk

मी बाबरी मशीद पाडण्यासाठी गेले होते | साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

News Desk

मोदींचे संसदेतील भाषण प्रथेला धरून नव्हते!

News Desk