HW News Marathi
राजकारण

अजित पवार ‘मुतऱ्या’ तोंडाचे सामनातून टीका

मुंबई | अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही. अयोध्येत राम मंदिरास विरोध हेच त्यांचे धोरण आहे. अजित पवारांनी प्रभू श्रीरामाचाही अपमान केला. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात. शिवसेना सरकारमध्ये बसून महाराष्ट्रातील दुष्काळावर काय करते?, अशी खालच्या पातळीची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून केली आहे.

सामनाचे आजचे संपादकीय

अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात. राष्ट्रवादी काँग्रेस हा आजही शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही. अयोध्येत राममंदिरास विरोध हेच त्यांचे धोरण आहे. अजित पवारांनी प्रभू श्रीरामाचाही अपमान केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. अशा नरा मोजुनी माराव्या पैजारा, हजार माराव्यात व एक मोजावी असे जे संतांनी सांगितले आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही!

‘काय तर म्हणे 25 तारखेला अयोध्येला जाणार. काय तिथं दिवा लावणार! अरे तुला तुझ्या बापाचं स्मारक पाच वर्षात करता आलं नाही. तिथं अयोध्येत जाऊन काय करणार आहे?’

– अजित पवार

अजित पवार हा पुण्याच्या राजकारणातील एक गटारी किडा आहे. गटारातील घाण पाण्यावर तो श्वास घेतो. भ्रष्टाचाराच्याच प्राणवायूवर जगतो. हे गटारही त्याचे स्वतःचे नसून त्याच्या पक्षानेच निर्माण केले आहे. त्यामुळे या गटारी किडय़ास महाराष्ट्रातील जनता कोणतीही किंमत देण्यास तयार नाही. तरीही हा गटारी किडा अधूनमधून वळवळत आणि बडबडत असतो. हे महाशय मंत्रालयात विराजमान असताना सुकलेल्या जिभा आणि कोरडे घसे घेऊन सोलापूरचे धरणग्रस्त पाणी मागायला मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले होते. त्यावेळी याच अजित पवारांनी ‘55 दिवस उपोषण करूनही पाणी मिळाले का? पाणीच नाही तर काय मुतायचं का?’ अशा प्रकारची निर्लज्ज भाषा वापरून महाराष्ट्राच्या संस्कृतीस काळिमा फासला होता व समस्त दुष्काळग्रस्तांना अपमानित केले होते. म्हणजे ‘पाणी नसेल तर मूत प्या. वाटल्यास मी धरणात मुततो!’ असाच याचा दुसरा अर्थ. या महाशयांनी एकदा आमच्या फोटोग्राफीच्या छंदावर टीका केली. यावर आम्ही त्यांचे दात त्यांच्या घशात घातले होते. ‘‘आम्ही आमचे छंद उघडपणे लोकांसमोर जोपासू शकतो. आम्ही आमच्या पंढरीची वारी, शिवरायांचे गडकोट किल्ल्यांच्या चित्रप्रदर्शनाचे जे छंद जोपासले आहेत ते उघडपणे करू शकतो, पण काय रे बारामतीच्या गटारी किडय़ा, तू तुझ्या छंदाचे प्रदर्शन उघडपणे करू शकशील काय?’’ यावर महाराष्ट्राच्या जनतेने घराघरात हशा आणि टाळ्यांचा कडकडाट केला. अजित पवार या गटारी किडय़ाचे नेमके काय छंद आहेत व त्या छंदांसाठी त्याने साताऱ्यात काय रेशमी उद्योग सुरू केले त्याविषयी इत्थ्यंभूत खबरबात श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले देऊ शकतील. अजित पवार या माणसाला महाराष्ट्राच्या राजकारणात काडीमात्र किंमत नाही. काकांच्या पुण्याईने व कृपेनेच ते तरले आहेत. हे महाशय अधूनमधून शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळी परिस्थिती यावर त्यांच्या ‘मुतऱ्या’ थोबाडाने बोलत असतात. शिवसेना सरकारमध्ये बसून महाराष्ट्रातील दुष्काळावर काय करते?

वगैरे प्रश्न

ते करीत असतात. मुळात अजित पवार व त्यांच्या टोळीने 70-80 हजार कोटींचा जलसिंचन घोटाळा केला नसता तर आजच्या दुष्काळ निवारणासाठी मोठा निधी उपलब्ध झाला असता. महाराष्ट्रात सलग 15 वर्षे सत्ता भोगत असताना त्यांच्या टोळीने जी सरकारी तिजोरीची लूट केली, त्यामुळेच शेतकऱ्यांच्या तोंडचा घास-पाणी पळाले आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली कुणी जलसंधारणाची लूट केली, कुणी बँका बुडवल्या, कुणी साखर कारखाने भंगारात काढले व महाराष्ट्रच भंगारात काढून शिवरायांच्या महाराष्ट्राची वाट लावली. दीड दशके राज्याची सत्ता भोगीत असताना ‘मराठा समाजाच्या आरक्षणावर’ त्यांनी त्यांच्या मुतऱ्या तोंडातून शब्द काढला नाही, पण सत्ता जाताच मराठा आरक्षणासाठी हे सवा इंचाची छाती दाखवत पुढे होते. या ढोंगीपणाचे थडगे महाराष्ट्राने बांधले व ते थडगे तहहयात तसेच राहील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. विरोधी पक्षाचे नेते म्हणून अजित पवार व त्यांच्या राष्ट्रवादी काँगेसने गेल्या चार वर्षांत काय केले? काहीच केले नाही. मुळात विधानसभेचे निकाल जाहीर होताच पहिल्या तासात कुणी शेणात तोंड घातले असेल तर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेच. भाजपचा चौखुर उधळलेला ‘टांगा’ महाराष्ट्रात शिवसेनेने रोखला व मोदींसह संपूर्ण भाजपने जंग जंग पछाडूनही राज्यात त्यांना बहुमत मिळू दिले नाही. अशा वेळी भाजपच्या टांग्यात चढून ‘तुम्ही सरकार बनवा आम्ही पाठिंबा देतो,’ असे प्रफुल पटेल सांगत होते तेव्हा त्या टांग्यात चढून अजित पवारांनी पटेलांना खाली खेचले असते तर आम्ही त्यांच्या हिमतीस दाद दिली असती, पण आता आपल्या जलसंधारणाचे घोटाळे बाहेर येतील म्हणून हेच अजित पवार गप्प बसले. भाजपची चमचेगिरी करत दिवस काढले. 70 हजार कोटींच्या घोटाळ्यात सहीसलामत सुटण्यासाठी भाजपचे जोडे पुसण्याची करसेवा केली. त्यामुळे ते आज सुटकेचा आनंद घेत आहेत. जलसंधारण घोटाळ्यात स्वतःची कातडी वाचवून अधिकाऱ्यांचा बळी देणारा हा

पळपुटामाणूस

आता अयोध्येतील राममंदिरावर व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर घसरला, म्हणून आम्ही त्यांची ही खेटराने पूजा केली. एरवी आम्ही त्याची दखल घेतली नसती. तरी बरे, महापौर बंगल्यात स्मारक व्हावे ही सूचना शरद पवारांचीच होती. काँग्रेस राजवटीत त्या कामास थोडी सुरुवात झाली होती. हे बहुतेक या दिवटय़ास माहीत नसावे. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक ही जबाबदारी फक्त आमची नसून संपूर्ण महाराष्ट्राची आहे. शिवसेनाप्रमुख नसते तर महाराष्ट्राचा अभिमान व मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे थडगेच बांधले गेले असते. बाळासाहेब ठाकरे हे लोकमान्य लोकपुरुष होते. आमचा ‘बाप’ हा असा होता. आम्हाला ‘बाप’ म्हणून त्यांच्याविषयी गर्व आहेच. पण कोटय़वधी मराठी मनांचे मानबिंदू व हिंदुहृदयसम्राट म्हणून तर जबरदस्त अभिमान आहे. अजित पवार, अभिमान बाळगू शकाल असे तुम्ही काही घडवले आहे काय? अजित पवार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ‘टाकाऊ’ माल आहे. विखेपाटील व अजित पवार यांचा रोख खरे तर भाजप सरकारवर, त्यांच्या घोटाळ्यांवर हवा, त्यांच्या अकार्यक्षमतेवर हवा; पण भाजपवर भुंकले तर घोटाळ्यांच्या फायली उघडल्या जातील या भयाने ते शिवसेनेवर भुंकत आहेत. भुजबळांच्या बाजूच्या कोठडय़ा तयार आहेत असा दम मुख्यमंत्र्यांनी देताच हेच पवार, विखेपाटील अनेक महिने कोमात गेले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा आजही शरद पवारांच्या करंगळीवर तरलेला एकखांबी तंबू आहे. या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. आम्ही त्या खोपडीस किंमत देत नाही. अयोध्येत राममंदिरास विरोध हेच त्यांचे धोरण आहे. अजित पवारांनी प्रभू श्रीरामाचाही अपमान केला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला. अशा नरा मोजुनी माराव्या पैजारा, हजार माराव्यात व एक मोजावी असे जे संतांनी सांगितले आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्राची जनता केल्याशिवाय राहणार नाही!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेठीत भाजपच्या स्मृती इराणींची आघाडी, काँग्रेसच्या वर्चस्वाला धोका ?

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरे फैजाबाद विमानतळावर दाखल

News Desk

भाजप आमदार राम कदमांचे बेताल वक्तव्य

News Desk