HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

निवडणुकांपूर्वी झालेल्या या चौकीदारांच्या चौक्या आम्ही बंद करू !

नवी दिल्ली | “हे सर्व निवडणुकांपूर्वी झालेले चौकीदार आहेत. आता या एका-एका चौकीदारांच्या चौक्या बंद करण्याचे काम आम्ही करू”, अशा शब्दांत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आम्ही महाआघाडीच्या माध्यमातून देशात बदल घडवू, असाही विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला आहे.आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी रविवारी (७ मार्च) देवबंदमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची संयुक्त सभा झाली.

समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या संयुक्त सभेत अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. “भाजपने इंग्रजांपेक्षा जास्त देशाला तोडण्याचे काम केले आहे. भाजपची मंडळी ठेकेदार झाली आहेत”, अशीही टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. “यंदाची निवडणुकांमध्ये आपल्याला इतिहास लिहिण्याची संधी आहे. सध्याचे नेते द्वेष पसरवण्याशिवाय काहीच करत नाहीत. ‘सराब’ बोलणारी मंडळी सत्तेच्या नशेत आहेत”, असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.

Related posts

रामदेव बाबांनी साधुसंताना केले धूम्रपान न करण्याचे आवाहन

News Desk

भाजप-शिवसेनेचं जमलंच ! हिंदुत्त्वासह लोकांच्या भावनेचा मुद्दा पुढे करून पुन्हा युती

News Desk

वैयक्तीक डेटा चोरीसाठी सरकारने आधार कार्ड केले सक्तीचे

News Desk