मुंबई | ईव्हीएमविरोधात सर्व विरोधकांकडून आज (२ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. ईव्हीएमविरोधात सर्व विरोधक २१ ऑगस्टला मुंबई मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात विरोधकांसोबत जनतेने देखील सहभागी होण्याचे आव्हान सर्वांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केली आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षांचा झेंडा दिसणार नसल्याचा दावा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. या परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकपा, आदी विरोधकांनी ईव्हीएमला विरोध दर्शविला आहे.
राज्यातील जनतेला मोर्चापूर्वी एक फॉर्म देण्यात येणार असून या फॉर्ममध्ये निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. जे नागरिक हे फॉर्म भरतील त्यांचे नाव, नंबर, पत्ता असे सगळी माहिती फॉर्ममध्ये भरण्यात येणार असून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून पुढील काही दिवस ही मोहीम राज्यभरात राबविण्यात येणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी यावेळी दिली. हे सगळे फॉर्म गोळा महाराष्ट्र निवडणूक आयुक्तांना देण्यात येतील, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, देशात ईव्हीएम मशीनवर संशय घेणारे वातावरण पाहायला मिळत आहे. निवडणुकीआधी सत्ताधारी पक्षाकडून जागांचे आकडे सांगितले जात आहे. इतका विश्वास त्यांच्याकडे आला कुठून? त्यामुळे ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्याला वाव मिळत आहे. त्यामुळे निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. चिप अमेरिकेत बनते मग त्यावर संशय घेता येणार नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या पत्रकार परिषदेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि नेते अजित पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आदी नेते मंडळीत सहभागी झाले आहेत. ही पत्रकार परिषद वांद्रे येथे पार पडली.
ईव्हीएमविरोधातील पत्रकार परिषदेतील मुद्दे
- निवडणूक आयोगांकडे अनेक प्रश्नांची उत्तर नाहीत- ठाकरे
- माझ्याकडे ईडीचे पत्र आले नाही, मला प्रसारमाध्यमांकडून या बातम्या कळत आहेत – ठाकरे
- पंतप्रधानांना भिती नाहीये , त्यांना लोकांवर विश्वास आहे तर मग मतपत्रिकेवर निवडणुक घ्या – भुजबळ
- ज्या प्रक्रियेवर विश्वास नाही, ती प्रक्रिया बदला – भुजबळ
- लोकशाही वाचविण्यासाठी पुढाकार घ्यावा – जयंत पाटील
- ईव्हीएमविरोधात जनतेने सहभागी व्हावे- बाळासाहेब थोरात
- अनेक महत्त्वाच्या पत्रकारांचा अंदाजही चुकला – बाळासाहेब थोरात
- संभ्रमाचे वातावरण आहे , तो दुर करण्यासाठी हा प्रयत्न आहे – बाळासाहेब थोरात
- राजू शेट्टींचे ग्रामीण भागातील मतदारांना
- स्वच्छ आणि पारदर्शक वातावरणात निवडणुक घ्यावी, हा मोर्चा सर्वसामान्यांचा असेल – राजू शेट्टी
- १५ ऑगस्टला गावसभेमध्ये ठराव करून २१ च्या मोर्चात हा ठराव मांडली जावा – राजू शेट्टी
- २०१९ लोकसभा निवडणुकीत अशी गोष्ट झाली की, निवडून आलेल्या धक्का बसलाच, परंतु हरणाऱ्याला देखील धक्का बसला – ठाकरे
- डोनाल्ड ट्रम्प यांनीसुद्धा ईव्हिएम वर अविश्वास दाखवला आहे – ठाकरे
- ईव्हीएम मशीनमध्ये मतांचा गोंधळ होतो का? – ठाकरे
- ईव्हीएम मशीन या अमेरिकेत बनतात, भारतातील ईव्हीएमची चिप अमेरिकेत बनते – ठाकरे
- ३७१ मतदारसंघात घोळ आहे, ५५ लाख पेक्षा जास्त मतांची घोळ आहे – ठाकरे
- २१ ऑगस्टला सर्व पक्षीय मोर्चा निघाणार – ठाकरे
- बॅलेट पेपरविरोधात घरोघरी अर्ज पाठविणार – ठाकरे
- ईव्हीएम आंदोलनाविरोधात कुठल्याही पक्षाचा झेंडा – ठाकरे
- मतदारांकडून ईव्हीएम विरोधात फॉर्म भरून घेणार – ठाकरे
- विरोधी पक्षासोबत नागरिक, एनजीओची मागणी – पवार
- विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर व्हाव्यात, सर्वांची मागणी – अजित पवार
- गैरविश्वास आहे असं नाही परंतु पारदर्शकता आणन्यासाठी हा प्रयत्न आहे -पवार
- राजकीय तसेच सामाजिक स्तरावरील लोकांनीसुद्धा यांसदर्भात शंका नोंदवली आहे – पवार
- पारदर्शक पद्धतीने मतदान पार पडावे – अजित पवार
- ईव्हीएमविरोधात भाजप-सनेने देखील सोबत यावे – राज ठाकरे
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.