HW News Marathi
राजकारण

अमित ठाकरे, रोहित पवार यांच्यात तब्बल सव्वा तास चर्चा

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात आज (१३ जून) तब्बल सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. फिनिक्स मिल कंपाऊंडमधील इंडिगो हॉटेलमध्ये या दोघांनीही एकत्र लंच केला असून त्यांच्यात तब्बल सव्वा तास चर्चा झाली आहे. दरम्यान, अमित ठाकरे हे अद्याप राजकारणात सक्रिय नसले तरी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने रोहित पवार यांच्या राजकीय हालचालींना मात्र चांगलाच वेग आला आहे. मात्र, अमित ठाकरे आणि रोहित पवार या दोघांमध्ये नेमकी राजकारणासंदर्भात चर्चा झाली कि त्या भेटीमागे अन्य कोणते कारण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : आता दररोज एक एक घराणे भाजपमध्ये येईल !

News Desk

मोदी हत्येचा कट रचणा-यांचा निषेध | आठवले

News Desk

पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात अशी घटना घडणे हे धक्कादायक !

News Desk