HW News Marathi
राजकारण

…अन् आम्ही गुन्हेगार नसताना आमचे नाव ईडीत येते !

मुंबई | “गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा हे निर्देश सुप्रीम कोर्टाला द्यावे लागतात आणि आम्ही गुन्हेगार नसताना आमचे नाव ईडीत येते, ही दडपशाही नाही का?”, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दणका देत २०१४ साली प्रतिज्ञापत्रात माहिती लपवण्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

“गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की खटला चालवा. गुन्हा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,हे निर्देश सुप्रीम कोर्टाला द्यावे लागतात आणि आम्ही गुन्हेगार नसताना ईडीत आमचे नाव येते, ही दडपशाही नाही का?”, असा ट्विट शरद पवार यांनी केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर दाखल झालेले हे गुन्हे नागपूरमधील आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना दिलासा दिला होता. मात्र, आता आगामी विधानसभेच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना मोठा दणका दिला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर देखील आता शरद पवार यांनी भाष्य करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. “सरकार दबावतंत्राचा उपयोग करत आहे. मी कोणत्याही बँकेचा संचालक नसताना माझ्यावर गुन्हा दाखल केला गेला. ईडीच्या माध्यमातून भीती दाखवली जात आहे. आम्ही कशाला भीत नाही.. पण हे दबावतंत्र आहे. या दबावतंत्राच्या राजकारणाला आपल्याला संपवायचे आहे”, असेही शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघरमध्ये भाजप विजयी

News Desk

जमीन, आकाश, अंतराळातसुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने केले !

News Desk

प्रियंका ही इंदिरा गांधींप्रमाणे हुकमाची राणी ठरू शकेल !

News Desk