HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

…अन् रणजितसिंहांनी केला घड्याळाचा प्रचार

माढा | काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील सांगोला या ठिकाणी झालेल्या भाजपच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या धोरणावर टीका करत असताना चुकून घड्याळाला मत द्या,असे बोलून गेले. भाजपसाठी मत मागण्याऐवजी सवयीप्रमाणे रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मत देण्याचे आवाहन करायला गेले. त्यानंतर “पत्रकार किती सावध आहे ते तपासायचे होते. म्हणून असे बोललो”, अशी सारवासारव देखील मोहिते पाटील यांनी केली आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या सांगोला येथील प्रचार सभेत बोलत होते. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या या भाषणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. ज्यांनी आपल्या पाण्याला विरोध केला. ज्यांनी आपल्या जीवनाला विरोध केला अशांना आपण आता मत द्यायचे नाही असे म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी येत्या २३ एप्रिलला घड्याळाला मत टाकण्याचे वाक्य उच्चारले. त्यानंतर लगेच त्यांच्या चूक लक्षात आली आणि त्यांनी उपस्थितांना हात जोडले. मात्र त्यांच्या या बोलण्यातील गल्लती मुळे उपस्थितांच्यात चांगलाच हशा पिकला.

माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आयात उमेदवार संजय शिंदे विरुद्ध भाजपचे आयात उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर अशी लढत होत आहे. या ठिकाणी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून दोन्ही पक्षामध्ये प्रचाराची चांगलच चुरस पाहण्यास मिळत आहे.

Related posts

भाजपमधील नेते मोदींकडे गेले कि त्यांच्या बायका घाबरतात कारण… !

News Desk

उन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे !

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सहमत नाही | रामदास आठवले

News Desk