HW Marathi
राजकारण

‘सन राइज’ करण्याचे वचन दिले होते, ‘सन’ला राइज करण्याचा प्रयत्न सुरू आहे !

अमरावती | “आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ‘सन राइज’ करण्याचे वचन दिले होते. परंतु ‘सन’ला राइज करण्याचा प्रयत्न करत आहेत,” अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूवर हल्लाबोल केला आहे. आंध्र प्रदेशमध्ये नवीन योजना आण्याचे वचन देखील केले होते. परंतु तसे न करता मोदी योजनांवर देखील आपल्या नावाचे स्टिकर लावले, असा आरोप मोदींनी चंद्रबाबूवर केला आहे.

२०१४ मध्ये आमचे सरकार आल्यानंतर आंध्र प्रदेशला विशेष राज्यासारखीच आम्ही मदत केली होती. तेव्हा आंध्र प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले होते. परंतु केंद्र सरकारने गेलेली मदत आंध्र सरकारने यांचा योग्य वापर केला नाही. राज्याचा विकास करण्यात अपयशी ठरलेल्या टीडीपीने एडीएतून बाहेर पडले, असे बोलत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूवर टीकास्त्र सोडले.तुम्ही नवनवीन लोकांसोबत गठबंधन करण्याबाबातीत सिनियर आहात. तुम्ही तुमच्या सासऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. तुम्ही सिनियर आहात, एक निवडणुकीनंतर दुसऱ्या निवडणूक हारण्यात देखील तुम्ही सिनियर आहात, असे बोलून मोदींनी चंद्राबाबूनां टोला लगावला

चंद्राबाबूंनी हे उद्या दिल्लीत फोटो काढण्यासाठी जात आहे. परंतु भाजप आपल्या कार्यकर्त्यांच्या पैशाने कार्यक्रम करते, तर हे आंध्रच्या जनतेच्या तिजोरीतून पैसे काढून कार्यक्रम करत आहेत, असेही मोदी म्हणाले आहेत. ते गुंटूरमधल्या आज (१० फेब्रुवारी) जनसभेला संबोधित करताना बोलत होते.

 

Related posts

आगामी लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होणारच !

News Desk

#Budget2019 : करदात्यांना मोठा दिलासा, ५ लाखापर्यंतचे उत्पन्न कर मुक्त

News Desk

खा.शरदचंद्रजी पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष.

News Desk