राळेगणसिद्धी | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आज (५ फेब्रुवारी) सातवा दिवस आहे. अण्णा हजारेंनी तब्बल ७ दिवसांनंतर आपले उपोषण अखेर मागे घेतले आहे. राज्य सरकारने अण्णांच्या उपोषणाची दखल घेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली आहे. फडणवीस यांनी अण्णा हजारेंची भेट घेतल्यानंतर आता अण्णा हजारे लवकरच उपोषण मागे घेणार असल्याची चर्चा सुरु होत होती. त्याचप्रमाणे अण्णा हजारेंनी आता आपले उपोषण मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातून लिंबूपाणी घेऊन अण्णा हजारेंनी आज आपले उपोषण मागे घेतले आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis: We have decided that the Lokpal search committee will meet on 13 February and the directions of the Supreme Court will be followed. A joint drafting committee has been set up, it will prepare a new bill and we will introduce it in next session. pic.twitter.com/6F2g73em7h
— ANI (@ANI) February 5, 2019
अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धी या आपल्या गावी ३० जानेवारीपासून लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला सुरुवात केली होती. या उपोषणामुळे अण्णा हजारेंची प्रकृती देखील बिघडली होती. अण्णा हजारेंच्या यकृतावर परिणाम झाला होता. तसेच त्यांना रक्तदाबाचाही त्रास सुरु झाला होता.
“अण्णांच्या मागण्या आम्ही मान्य केल्या असून लोकपालाची प्रक्रिया सरकार राबवत आहे. याबाबत १३ फेब्रुवारीला बैठक होणार आहे. सरकारने संयुक्त समिती स्थापन करून याचा ढाचा तयार करण्याचे मान्य केले आहे. पुढच्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल. तसेच कृषिमूल्याच्या संदर्भात कायद्यात बदल केला जाईल, नाशवंत मालाला भाव कसा मिळेल याबाबत विचार केला जाईल. ऑक्टोबरपर्यंत सर्व शिफारसी तयार करण्यात येतील. केंद्राने प्रधानमंत्री सन्मान योजनेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. याद्वारे दर वर्षाला ६००० हजार रुपये देण्यात येणार होते. यात राज्य सरकार वाढ करणार आहे”, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.