HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

सांगलीतून विशाल पाटील यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारी

सांगली | बहुचर्चित अशा सांगलीच्या जागेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (३० मार्च) वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विशाल पाटीलच्या उमेदवारीची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केले आहे.  लोकसभा निवडणुकीसाठी पाटील हे २ एप्रिलला अर्ज भरणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सांगलीची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडली. यानंतर सांगलीची जागा स्वाभिमानीला देण्यावरून वाद सुरू होता. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी याला विरोध केला होता. अखेर सांगलीच्या जागेचा तिढा सुटला आहे. ही जागा काँग्रेसकडूनच लढणार अन्यथा अपक्ष म्हणून लढणार, असा निर्धार विशाल पाटील यांनी म्हटले होते. परंतु राजू शेट्टी यांनी काल (२९ मार्च) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा झाली. यानंतर विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय झाला.

 

 

 

 

Related posts

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला मोदींच्या कार्याचा गवगवा

News Desk

हे पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाहीत !

News Desk

लोकसभेच्या जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्या मुख्यमंत्री-पक्षप्रमुखांची भेट

News Desk