HW News Marathi
राजकारण

“कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई | “जोपर्यंत महाराष्ट्र-कर्नाटक विषय न्यायालयात प्रलंबित आहे. तोपर्यंत हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित झालाच पाहिजे”, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानपरिषदेत केली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा आज (26 डिसेंबर) सहावा दिवस आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादवर (Maharashtra-Karnataka border dispute) उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर मुख्यमंत्र्यांनी ‘ब्र’ तरी आजपर्यंत काढला आहे का?, असा सवाल करत त्यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “कारण ते मुख्यमंत्री (कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई) तिकडे जोरात बोलत आहेत. आमचे मुख्यमंत्री मी राजकीय बोलत नाही. आमच्या मुख्यमंत्र्यांनी एक ‘ब्र’ तरी आजपर्यंत काढला आहे का?, बरे हा मुद्दा सोडविणार कोण?, तुम्ही ठराव मांडणार आहात. हा ठराव नेमका काय असणार आहे. आपण काय विचार केले?, शब्दांकन केले आहे का?, माझे मत आहे हा ठराव असा असला पाहिजे. जोपर्यंत महाराष्ट्र-कर्नाटक विषय न्यायालयात प्रलंबित आहे. तोपर्यंत हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र हा केंद्रशासित झालाच पाहिजे. ही मागणी या ठरावाद्वारे आपण केली पाहिजे. आणि विधीमंडळाकडून केंद्राकडे पाठविली पाहिजे. केंद्र शासित करा प्रदेश कारण दरवेळेला हे अत्याचार होता, आम्ही काय करतो, नुसत्या बसेसला काळे फासतो. दोन-चार काचा फोडतो, पण, तिकडे आपल्या मराठी माणसाला फरफडत नेहले जात आहे. लाठीमार केला जात आहे.”

राज्य सरकार ग्रामपंचायती बरखास्त करणार का?

राज्यातील ग्रामपंचायतींना महाराष्ट्रबाहेर जाण्याचा ठरावावर उद्धव ठाकरे म्हणाले,  “अगदी बेळगावच्या महापालिकेने महाराष्ट्रात जायाचे आहे. हा ठराव पास केल्यानंतरही ती महापालिका बरखास्त करण्यात आली. आज मी ऐकतोय की आपल्या काही ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीने ठराव केला की, कर्नाटकात जाणार. आपण त्यांच्याबद्दल काय करणार आहोत. आपण त्यांच्याबद्दल शिस्तभंग किंवा राजद्रोहाचा खटला टाकणार आहोत का?, जसा तिथल्या महापौरांवर टाकला गेला होता. त्यांनी बेळगावची महापालिका बरखास्त केलीच ना. आपण ग्रामपंचयात बरखास्त करणार आहोत का?, कोणत्याही पक्षाचा असो, आम्ही ऐवढ्या ग्रामपंचयती जिंकल्या. होय, तुम्ही जिंकल्यात पण, त्या जिंकलेल्या ग्रामपंचायती महाराष्ट्राविरोधात काही ठराव करत असतील, तर तुम्ही अभिमानाने सांगणार आहात. या आमच्या पक्षाने जिंकलेल्या ग्रामपंचायती आहेत. का बरखास्त करणार आहात, काय करणार आहात. त्यांच्या सुद्धा निकाल लागला पाहिजे, आणि ठराव करणार असाल, तर चर्चा करू नका. चुइंगम चावल्यासारखे तोंड हलविल्यासारखे करून त्यांची थटा करण्याची आता गरज नाही. गेली अनेक वर्ष पिढ्यांपिढ्या ती लोक सांगत आहेत.”

 

Related posts

#LokSabhaElections2019 : सुरक्षेच्या कारणास्तव काश्मीरच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या

News Desk

तेजबहादूर यादव यांची वाराणसीची उमेदवारी रद्द केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव

News Desk

Live Update : खुशखबर ! मराठा समाजाला अखेर यश

News Desk