HW News Marathi
राजकारण

धैर्यशील मानेंच्या घराजवळ आंदोलन करणारे शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | कोल्हापूरमधील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करत नुकतेच शिंदे यांच्या गटात सामील झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हप्रमुख संजय पवार यांनी आज (25 जुलै) कोल्हापुरात मानेंच्या घराच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर त्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी पवार यांच्यासह मुरलीधर जाधव , आणि विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात आंदोलन सुरू होते. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, देशात सध्या दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामुळे माने हे दिल्लीत असल्यामुळे त्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मानेविरोधात काढलेला शिवसैनिकांचा मोर्चा पोलिसांनी 400 मीटर अंतरावर रोखला असून पोलिसांनी संजय पवारसह शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

शिवसैनिकांनी मानेविरोधात आंदोलन करताना माने जवाब दो आणि गली गली में शोर है माने चोर अशा घोषणाबाजी करण्यात आली होती. पोलिसांनी संजय पवार, मुरलीधर जाधव आणि विजय देवणे या तिघांच्या नेतृत्वाच आंदोलन करण्यात आले होते. आणि पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…जणू काही खेडला दसरा मेळाव्याची जाहीर सभाच”, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना टोला

Aprna

ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची आपच्या महाराष्ट्राच्या संयोजक पदी निवड

swarit

अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची सांत्वनपर मदत द्या !

News Desk