HW Marathi
राजकारण विधानसभा निवडणूक २०१९

महाजनांना बाकीच्या उद्योगांपुढे विकासाकडे दुर्लक्ष करावे लागले असेल !

जळगाव। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शुक्रवारी जळगाव जिल्ह्यात आले होते. यावेळी जळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांनी गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली.

 

“गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जामनेरमध्ये सर्वाधिक पाणीटंचाई व कुपोषण असून आम्ही सुरू केलेली कामे सुद्धा या सरकारला पूर्ण करता आली नाहीत. महाजनांना बाकीच्या उद्योगांमुळे या विकास कामांकडे दुर्लक्ष करावे लागत असेल, हे आम्ही समजू शकतो. मात्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी जबाबदारीने यात लक्ष द्यायला हवं होतं”, असे म्हणत जयंत पाटील यांनी गिरीश महाजन आणि मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला आहे.

गिरीश महाजन यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना पुढे जयंत पाटील असे म्हणाले की, “गिरीश महाजन यांनी ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला का हे मला माहिती नाही महाराष्ट्राची परिस्थिती त्यापेक्षा वेगळी असून आम्ही चांगल्या जागा घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली”

Related posts

लोकसभेसाठी सपा-बसपाचे जागावाटप जाहीर

News Desk

जागावाटपाला उशीर झाला तरी चालेल, पुण्यातील पूरपरिस्थितीकडे लक्ष द्या !

News Desk

पुलवामा हल्ला केवळ मतांसाठी घडवून आणला होता !

News Desk