HW News Marathi
राजकारण

पंतप्रधानांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदाराची हजेरी, चर्चांना उधाण

मुंबई | पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शनिवारी (७ सप्टेंबर) मुंबईत पार पडलेल्या मेट्रो मार्गिकांच्या भूमिपूजन कार्यक्रमात एका राष्ट्रवादीच्या राज्यसभा खासदाराच्या उपस्थितीमुळे मोठी खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेनन या भूमिपूजन कार्यक्रमात उपस्थित राहिल्याने आता ते देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. मात्र, आता माजिद मेनन यांनी स्वतःच या पक्षांतराच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या भूमिपूजन कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, पियुष गोयल देखील उपस्थित होते.

“सरकार कोणाचेही असले तरीही चांगल्या कामाची आपण प्रशंसा करतोच”, अशी प्रतिक्रिया माजिद मेनन यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे “मी पक्षांतर करणार नाही. मी शरद पवारांशी निष्ठा बाळगून आहे”, असेही माजिद मेमन यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. लोकसभेत आणि आता विशेषतः विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीला अनेक बड्या नेते, पदाधिकाऱ्यांनी भाजप-शिवसेनेत पक्षप्रवेश केला आहे. अद्याप हे पक्षांतर सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर, माजिद मेनन यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगत होत्या. मात्र, माजिद मेनन यांनी पक्षांतराबाबतचे हे वृत्त फेटाळले आहे.

राज्यातील या पक्षांतराचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला आहे. एकीकडे एका पाठोपाठ एक सुरु असलेल्या इनकमिंगमुळे भाजप-शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीपुढे मात्र राज्यात आपले अस्तित्त्व टिकवून ठेवण्याचे आव्हान आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डिवचायचा प्रयत्न होणार पण तुम्ही शांत रहा !

News Desk

हे सत्य स्वीकारण्याची हिंमत दाखवाल का ?, अनिल गोटेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल

News Desk

नागरिकांना पुराची भीषणता जाणवणार नाही, यासाठी प्रशासनाने समन्वयातून पूरपरिस्थिती हाताळावी! –छगन भुजबळ

Aprna