HW News Marathi
राजकारण

“बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय…,” ED च्या कारवाईवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई। पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी (Patra Chawl case) शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले आहे. ईडीचे  (ED) पथक आज (३१ जुलै) राऊतांच्या भांडूप येथील मैत्री निवासस्थानी दाखल झाले. या प्रकरणी ईडी राऊतांची चौकशी करणार असून राऊतांना अटक होण्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. ईडीची कारवाई सुरू असताना राऊतांनी तीन ट्विट प्रतिक्रिया दिली आहे आहे.

राऊतांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले, शिवसेनेचे चिन्ह असलेला फोटो ट्वीट केला आहे. आणि या फोटोला “तरीही शिवसेना सोडणार नाही… “, असे ट्वीट केले आहे. दुसऱ्या ट्विटमध्ये राऊत म्हणाले, “ही खोटी कारवाई आहे. या प्रकरणातील पुरावे देखील खोटे आहेत. मी शिवसेना सोडणार नाही आणि मरेन पण शरण जाणार नाही.”

या कारवाई प्रकरणी राऊतांनी तिसऱ्या ट्विटमध्ये म्हटले, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे.. बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन.”

नेमके काय आहे प्रकरण

मुंबई येथील गोरेगावमध्ये पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. यात राऊतांचे निटकवर्तीय प्रवीण राऊत यांची गुरु आशिष कन्स्टरक्शन कंपनीला या चाळचा विकास करण्याचे काम देण्यात आले होते. या चाळीच्या जागेचा काही भाग त्यांनी खासगी बिल्डरला विकल्याचाआरोप राऊतांवर केला आहे. प्रवीण राऊतांनी पत्राचाळीतील लोकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. प्रवीण राऊतांनी चाळतील 3 हाजार फ्लॅट बांधकाम सुरू होते. यापैकी 672 फ्लॅट चाळीतील लोकांना द्याचे होते. तर त्या व्यतिरिक्त म्हाडा आणि विकासक यांना वाटून घ्याचे होते. पण 2010 मध्ये प्रवीण राऊतांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएल कंपनीला विकले. यानंतर पत्राचाळी भूखंड 2011, 2012 आणि 2013 अनेक खासगी बिल्डर्सना हस्तांतरित केला.

संबंधित बातम्या

संजय राऊत यांच्या निवासस्थानी ED चे पथक दाखल; ‘या’ प्रकरणी अटक होणार?

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अग्निशमन केंद्राच्या जागेवर सहकारमंत्र्यांचा बंगला

News Desk

आमदार राणा यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल !

News Desk

लोकशाही दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून कार्यक्रमाचे आयोजन

News Desk