HW Marathi
राजकारण लोकसभा निवडणुक 2019

मावळमधील पराभवामुळे फिका पडला बारामतीचा विजयोत्सव

बारामती | यंदाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (२३ मे) जाहीर झाला असून देशातील जनतेने निर्विवादपणे पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या बाजूने बहुमताने कौल दिला आहे. या निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय पक्षांची समीकरणे पूर्णपणे ढवळून निघाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या निकलांकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष होते. दरम्यान, राज्यातही महायुतीनेच आघाडी घेत काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे १ लाखाहून अधिक मतांनी विजयी झाल्या. परंतु, दुसरीकडे मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांचा पराभव झाला. मावळमधील या पराभवामुळे बारामतीत मात्र राष्ट्रवादीच्या विजयोत्सवचा उत्साह फिका पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत एकदाही निवडणूक हारले नाहीत. अजित पवार देखील १९९१ साली राजकारणात केलेल्या प्रवेशानंतर कोणतीही निवडणूक हारले नाहीत. सुप्रिया सुळे यांनी देखील बारामतीत विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यामुळे पार्थ यांचा पराभव हा पवार घराण्याचा पहिलाच पराभव आहे. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच पार्थ पवार हे पिछाडीवरच होते. राष्ट्रवादीकडून मावळमधून पार्थ पवार विजयी होतील अशी खात्री देखील व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान, पार्थ पवार यांचा भीषण पराभव झाला.

Related posts

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘आफ्स्पा’बाबतच्या आश्वासनावर अमित शहांची सडकून टीका

News Desk

उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यादरम्यान अतिदक्षतेचा इशारा

News Desk

संघाकडून शिकण्यासारखे असे काहीही नाही !

News Desk