HW News Marathi
राजकारण

मुंबई उच्च न्यायालयाच्या जामीन अर्जाच्या आधारे अनिल देशमुख यांनी CBI न्यायालयाचा दरवाजा ठोठावला

मुंबई | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सीबीआय न्यायालयात जामीनासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देशमुखांकडून मुंबई उच्च न्यायालयाने ईडीच्या केसमध्ये जामीन दिला आहे. या आधारावर सीबीआयच्या न्यायालयात देशमुखांना जामीनासाठी अर्ज केला आहे. देशमुखांनी जामीनासाठी दाखल केलाल्या अर्जात दोन्ही गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

न्यायालयाने देशमुखांना तब्बल 11 महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयाने देशमुखांना 1 लाख रुपयांच्या जातमुचल्क्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 100 कोटी वसुलीप्रकरण आणि मनी लाँड्रिंग  (Money Laundering) प्रकरणात इडी आणि सीबीआयने देशमुखांवर वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाकडू देशमुखांचा जामीन अर्ज सतत फेटाळून लावला. देशमुख हे नोव्हेंबर 2021 पासून तुरुंगात होते. परंतु, अखेर 11 महिन्यांनंतर न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला होता.

 

नेमके काय आहे प्रकरण

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर स्फोटकाने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाली. स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. यानंतर देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटीची वसुली केल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडी करत असून या प्रकरणी ईडीने देशमुखांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. देशमुखांनी ईडीची अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळून लावली. यानंतर देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. आणि ईडीने चौकशी केल्यानंतर देशमुखांना अटक केले होते.

संबंधित बातम्या

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळूनही तुरुंगातच रहावे लागणार; कारण…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन वर्षांनंतर छगन भुजबळ विधानभवनात दाखल

News Desk

राहुल यांची भेट म्हणजे राजकीय खेळी, पर्रीकरांनी सुनावले

News Desk

मराठा आरक्षणाबाबत बाहेर घोषणा करण्यापेक्षा सभागृहात विधेयक आणा !

News Desk