HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या धमक्यांमुळे माझा भाजप प्रवेश रखडला !

मुंबई | “शिवसेनेच्या धमक्यांमुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आणि माझा भाजप प्रवेश रखडला”, असा धक्कादायक खुलासा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. “मला पक्षात घेतले तर पाठिंबा काढून घेण्याची धमकी शिवसेनेने दिल्याने भाजप नेते अस्वस्थ झाले. त्यामुळेच माझा पक्षप्रवेश रखडला”, असे नारायण राणे यावेळी म्हणाले. नारायण राणे यांच्या आत्मचरित्रात असे बरेच धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. दरम्यान, काहीच दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नारायण राणे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन होणार आहे.

“चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीच्या लग्नात माझी मुख्यमंत्र्यांशी भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला भाजप प्रवेशाचे आश्वासन दिले होते. त्यांनी मला ‘वर्षा’वर देखील बोलावले होते. त्यानंतर काही दिवस मुख्यमंत्री माझ्या संपर्कात होते. त्याचवेळी माझी नितीन गडकरी यांच्याशी देखील चर्चा झाली होती. मात्र, मला पक्षात घेतल्यास पाठिंबा काढण्याची धमकी शिवसेनेने दिली. त्यामुळे भाजप नेते अस्वस्थ झाले आणि माझा भाजप प्रवेश रखडला”, असा खुलासा नारायण राणे यांच्या आत्मचरित्रात करण्यात आला आहे.

“नंबर दोनचे नेते चलबिचल झाले. पक्षासाठी भाजपमध्ये प्रवेश करा सांगणाऱ्या, माझ्या घरी टॅक्सीमधून फेऱ्या मारणाऱ्या मंत्र्यांना माझा विसर पडला. त्यांना नेत्यांना कळले कि माझा पक्ष प्रवेश झाला तर त्यांच्याकडची मोठी खाती माझ्याकडे येतील. त्यांना अशी भीती वाटू लागली कि आपण दुसऱ्याचे घर वाचवायला गेलो तर आपले स्वतःचे घर धोक्यात येईल. म्हणूनच त्यांनी मला पक्षात घेतले नाही”, असे म्हणत नारायण राणे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर केले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी तुमच्या पापाचा घडा भरला आहे | नवाब मलिक

News Desk

गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांची हजेरी; तर मुंडे बहिणींची दांडी

Aprna

पीएम मोदींच्या ‘एअर स्ट्राईक’मुळे विरोधकांच्या महागाई, बेरोजगारीसह राफेल घोटाळ्यांवर ‘बॉम्ब’ पडला

News Desk