HW News Marathi
राजकारण

निवडणुकांपूर्वी पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडविला जाईल !

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज १३ वा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वांद्रे रंगशारदा सभागृहात भाषण दिले. यावेळी राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ला, एअर स्ट्राईक, लोकसभा निवडणुका, भाजप, पंतप्रधान मोदी, राफेल करार यासह अन्य अनेक गोष्टींवर आपले मत मांडले आहे. लोकसभा निवडणुकांबाबतचा निर्णय योग्य वेळी जाहीर करेन, असे राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

* लोकसभेचा निर्णय योग्य वेळी जाहीर करेन.

* लोकसभा लढविणार कि नाही ते नंतर जाहीर करेन

* जुनं विसरण्यासाठी नवीन काहीतरी घडविले जात आहे

* नरेंद्र मोदींच्या आयटी सेलमधली पोरे अशीच फिरत असतात

* भाजपच्या ट्रोलिंगला मी भीक घालत नाही

* राज यांच्या भाषणादरम्यान ‘चौकीदार चोर है”च्या घोषणा

* युद्धाला पाठिंबा देणाऱ्यांना राज ठाकरेंनी सुनावले

* अजित डोवाल हा माणूस मला नक्कीच माहित आहे

* अजित डोवाल यांच्या मुलाच्या कंपनीतला एक पार्टनर अरब आणि दुसरा पार्टनर पाकिस्तानी आहे

* हल्ला झाला कि यांची राष्ट्रभक्ती कपाटातून बाहेर येते

* मोदींनी नवाझ शरीफांना केक का भरवला ?, राज ठाकरेंचा सवाल

* मोदीभक्तांनी राष्ट्रभक्ती शिकवू नये

* मी ज्योतिषी नाही, परंतु हे लोकं काय घडवू शकतात ते मला माहिती आहे

* निवडणुकीच्या तोंडावर देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण केली

* हल्ला असाच कसा घडतो ? राज यांचा गंभीर सवाल

* सुरक्षा यंत्रणांकडून हल्ला होईल याची शक्यता वर्तविण्यात आली होती

* आमचे जवान मारले जात आहेत, तर मग आम्ही प्रश्न देखील नाही विचारायचे ?

* मोदी कसले फकीर, मोदी तर बेफिकीर

* पुलवामा हल्ल्यानंतर दर दिवशीचे नरेंद्र मोदींचे स्टायलिश कपडे बघा. त्यांच्या चेहऱ्यावर दुःख कुठे आहे ?

* एअर स्ट्राईकमध्ये खात्मा झालेल्या लोकांची संख्या सांगणाऱ्यांवर टीका

* सरकारने सैनिकांना चुकीची माहिती पुरविली

* निवडणुकांसाठी जवानांचा वापर केला

* मोदी म्हणतात, “आता आपल्याकडे जर राफेल असते तर परिस्थिती वेगळी असती.” मग आमच्या जवानांनी गाजविलेले शौर्य काहीच नाही ?

* राफेलवरून भाजप आणि मोदी सरकारवर सडकून टीका

* वेडं बनवायची काही मर्यादा आहे कि नाही ?

* “जवानांपेक्षा जास्त जोखीम व्यापारी घेतात”, असे देशाचे पंतप्रधान कसे बोलू शकतात ?

* निवडणुकांपूर्वी पुलवामासारखा आणखी एक हल्ला घडविला जाईल

* राफेल कागदपत्रे चोरी प्रकरणी सरकारवर टीका

* मोदींनी २५ डिसेंबर २०१५ ला नवाझ शरीफांना केक भरवला, पुढच्या ७ दिवसात पठाणकोट हल्ला झाला

* मोदी सरकारकडून वारंवार चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात होते. मग वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनवला ?

* “विरोध चालेल, विनोद देखील चालेल परंतु आपल्या कोणत्याही गोष्टीवर जर कोणी शिव्या घातल्या, तर घराबाहेर काढून मारा”, राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश

* मला प्रश्न पडतात ते तुम्हाला देखील पडायला हवेत

* आमची आमच्या पक्षांतर्गतच चर्चा सुरु आहे. मी प्रकाश आंबेडकर नाही.

* मी निर्णय घेईन तो तुमच्या, महाराष्ट्राच्या, देशाच्या हिताचा असेल

* मी आज मांडलेल्या गोष्टी विसरू नका

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुजरातचे पंतप्रधान मोदी, फडणवीस मटका एजंट – राज ठाकरे

News Desk

पुढची २५ वर्षे तरी मोदींना कोणीही धक्का देऊ शकणार नाही !

News Desk

#LokSabhaElections2019 : रणजितसिंह नाईक निंबाळकर देखील भाजपच्या गोटात ?

News Desk