HW News Marathi
राजकारण

बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार !

मुंबई | बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार असल्याची माहिती बेस्ट कृती समितीचे कामगार नेते शशांक राव यांनी दिली आहे. शशांकराव हे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. प्रशासन आणि कामगार संघटना आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, बेस्टच्या संपात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे आज (११ जानेवारी) मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडून देखील बेस्ट कर्मचाऱ्यांना दिलासा मिळालेला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी (१४ जानेवारी) सुनावणी होणार आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर उद्या (१२ जानेवारी) राज्य सरकारच्या उच्च स्तरीय समितीची बैठक होणार आहे. संप मिटल्याची घोषणा करण्याचा आग्रह सरकार आणि पालिकेकडून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना केला जात आहे. मात्र, संपावर तोडगा काढल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, असे संघटनांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर आज चौथ्या दिवशी देखील तोडगा निघालेला नाही.

.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, मोदी वाराणसीतून लढणार

News Desk

मालमत्तेचे नुकसान व जीवितहानीसारखे गुन्हे वगळता शेतकरी आंदोलकांवरील इतर गुन्हे शासन मागे घेणार! – अजित पवार

Aprna

कवी छगन भुजबळ,वाचा सविस्तर…

swarit