HW News Marathi
राजकारण

RamMandir : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला मनसे शुभेच्छा !

मुंबई | राज्यात आणि देशात गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराचा मुद्दा प्रचंड प्रमाणात गाजताना पहायला मिळत आहे. दस-याला शिवसैनिकांना संबोधित करताना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राम मंदीराचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचबरोबर २५ नोव्हेंबर रोजी आपण अयोध्येला जात असल्याची घोषणा केली होती. तेव्हापासून तयारीत असलेले उद्धव ठाकरे आज अयोध्येला रवाना झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेकडून उद्धव ठाकरे यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

दादरच्या शिवसेना भवन समोर असलेल्या कोहीनूरच्या पदपथावर मनसेने पोस्टरबाजी केली आहे. यावेळी मनसेने खोचक शब्दात सेनेवर टिका केल्याचे शनिवारी सकाळी पहायला मिळाले. सत्तेत असून मित्र पक्षावर वारंवार सेनेकडून टिका केली जाते. अयोध्येला निघालो जोशात राजिनामे मात्र अजून ही खिशात असे लिहलेले पोस्टर सेनाभवन परीसरात लावण्यात आले होते. परंतु हा संपुर्ण प्रकार लक्षात येताच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काही वेळातच शिवाजी पार्क पोलिसांनी हे पोस्टर हटवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जितेंद्र आव्हाडांनी आमदाराकीचा दिला राजीनामा; जयंत पाटील म्हणाले…

Aprna

ठाण्याच्या कचर्‍यावर पोसली जातेय शिवसेना !

News Desk

पंडित नेहरुंमुळे आज देश प्रगतीपथावरः जितेंद्र आव्हाड

News Desk