HW News Marathi
राजकारण

भंडारा-गोंदियामध्ये भाजपकडून आचारसंहितेचा भंग

गोदिंया | भंडारा-गोंदियात लोकसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे हेमंत पटले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांच्यात दुहेरी लढत होणार आहे.

भाजपला भंडारा-गोंदिया व पालघर या दोन्ही ठिकाणांच्या पोटनिवडणुकीत मुळीच हार पत्करायची नाही. लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी साम,दाम,दंड,भेत या नीतीचा अवलंब करावा लागला. तरीही चालेल असे शब्द खुद राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना इशारा दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जाहीर सभेत ही ऑडिओ क्लिप सादर केली.

हे प्रकरण शांत होते न तोपर्यंत भाजपने भंडारा-गोंदियात आचारसंहिता भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदमध्ये केले. या पोटनिवडणुकीत भाजपच्या आडचणीत वाढ येताना दिसत आहे. भंडारा-गोंदिया येथे धान पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचे तुडतुड्या रोगामुळे नुकसान झाले होते.

विधानसभेमध्ये नुकसान भरपाई देण्याबाबत विरोधकांनी मागणी केल्यानंतर शासनाने ही भरपाई देणे मान्य केले होते. सहा महिने उलटून गेल्यानंतरही भरपाई देण्यात आली नाही. मात्र सध्या भंडारा-गोंदिया येथे लोकसभा पोटनिवडणूक म्हणून येथे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आज जिल्हा ट्रेझररीमध्ये असलेले पैसे शेतक-यांच्या खात्यात टाकण्यात आले.

आणि तर हे पैसे उद्या ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकले जाणार आहेत. म्हणजे हा सरळ सरळ आचारसंहिते भंग करून मतदान मिळवण्याचा भाजप सरकारकडून प्रयत्न सुरू आहे. या सर्व प्रकराची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. आयोगकडे तक्रार केल्यानंतर दखल घेऊन या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करुन गुन्हेगारावर आचारसंहितेचा भंग केल्याची कारवाई करण्यात यावी.

जर या विरोधात कारवाई झाली नाही तर नाईलाजाने आम्हाला कोर्टामध्ये धाव घ्यावी लागणार आहे. तसेच याविषयावर व्यापक जनआंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LokSabhaElections2019 : पार्थ पवार यांची उमेदवारी अजून निश्चित झालेली नाही !

News Desk

मोदींची सिंगापुर येथील मुलाखत पुर्णपणे स्क्रिप्टेड | राहुल गांधी

News Desk

शरद पवार हे फिल्डवरचे नेते !

News Desk