HW News Marathi
राजकारण

भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली । आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप पक्षाने उमेदवारांची पहिली यादी शनिवारी (२०ऑक्टोबर) रात्री केली आहे. यात छत्तीसगडमधील ७७, तेलंगणातल्या ३८ आणि मिझोरममधल्या १३ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.शनिवारी पक्षाच्या बैठकीत या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांची नावे जाहीर केली. या सीईसीच्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह आणि भाजपाचे वरिष्ठ नेते मंडळी उपस्थित होती.

छत्तीसगडमधल्या भाजपाच्या पहिल्या यादीमध्ये १४ महिलांना स्थान देण्यात आले आहे. तसेच भाजपाने छत्तीसगडमधल्या इतर २५ जागांवरून ४०वर्षांखालील उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. तर अनुसूचित जातीच्या २९उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. १२ नोव्हेंबरला छत्तीसगडच्या १८जागांसाठी मतदान होणार आहे. छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल ११ डिसेंबरला लागणार आहे. भाजपानं या १८ जागांपैकी १७ जागांवरच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात बस्तरच्या १२ आणि राजनांदगावच्या ६ जागांवर मतदान होणार आहे . आयएएस अधिकारी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा देणाऱ्या ओ. पी. चौधरी यांना खरसिया या जागेतून उमेदवारी दिली गेली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणामध्ये ३८ जागा घेण्यात आल्या आहेत तर मिझोराममधून विधानसभा निवडणुकीसाठी १३ जागा घेण्यात आल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मागासवर्ग आयोगाच्या अहवालातल्या शिफारशी अजूनही अस्पष्ट !

News Desk

शेट्टींच्या वक्तव्यावर पवारांचे टीकास्त्र

News Desk

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk