HW News Marathi
महाराष्ट्र राजकारण

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय

मुंबई | चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Chinchwad bypoll Results) भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांना 36 हजार 168 मतांनी आघाडीवर आहे. अश्विनी जगताप यांना एकूण 1 लाख 35 हजार 603 मते मिळाली आहे.  अश्विनी जगताप या सुरुवातीपासून आघाडीवर होत्या. यामुळे अश्विनी जगताप यांचा विजय हा एकतर्फी मानला जातो तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष कलाटे या दोघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अश्विनी जगताप यांनी विजयानंतर जल्लोष न करता पती लक्ष्मण जगताप यांच्या समाधीला भेट देण्यासाठी निघणार आहेत.

दरम्यान, अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 603 मतांनी विजय झाला आहे. तर या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांन 99 हजार 435 मतांनी परावभ केला. तर बंडखोर आणि अपक्ष आमदार रालु कलाटे यांना 44 हजार 112 मते मिळाली.

दरम्यान, भाजपला चिंचवडचा गड राखण्यात मोठे यश आले आहे. चिंचवडमधील दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक लागली. भाजपने चिंचवड पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांच्या जागी त्यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. परंतु, कसबा पोटनिवडणुकीत मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. यामुळे कसबा मतदारसंघ भाजपच्या हातातून निघाल्याचे बोलले जाते.  भाजपने पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये प्रतिष्ठा पणाला लावली होती. भाजपने दोन्ही विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री आणि भाजपच्या प्रमुख नेते प्रचारात उतरले होते. तरी देखील कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला.

कसब्यात मविआचा विजयी

महाविकासआघाडीचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांना 11 हजार 40 मतांनी विजयी झाला आहे. गेल्या 28 वर्षात कसबा भाजपच्या बाल्लेकिल्यात काबीज करण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी 72 हजार 599 मते मिळाली आहे.

 

संबंधित बातम्या

कसब्यात ‘मविआ’चे रवींद्र धंगेकर यांचा विजय; 28 वर्षानंतर ‘भाजप’चा पराभव

Related posts

कावळ्याच्या शापाने गुरं मरत नाहीत,अजित पवारांचा निलेश राणेंना सणसणीत टोला!

News Desk

हे पेट्रोलचे नाव बदलायलाही मागेपुढे पाहणार नाहीत !

News Desk

अजित पवारांच्या आदेशाने कारवाई झाली असेल तर पुरावे द्या, तुमच्या वतीने त्यांची तक्रार करेन!

News Desk