मुंबई | आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या दृष्टीने भाजप आतापासूनच कामाला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीला 2 वर्ष शिल्लक असूनही भाजपने आतापासून मोर्चे बांधणीला सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आज (16 जून) आज बैठक बोलवली होती. या बैठकीत भाजपकडून ‘मिशन 45’ची घोषणा केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी ज्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला. त्या ठिकाणी जास्त लक्ष केंद्र केले जाणार आहे,” अशी माहिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
Joined @BJP4Maharashtra organisational review meeting at BJP Maharashtra office in Mumbai with @BJP4India National GS @TawdeVinod ji, State President @ChDadaPatil , @ShelarAshish , @cbawankule & other leaders.#BJP #Maharashtra pic.twitter.com/qIR7yZ2wK7
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 16, 2022
फडणवीस म्हणाले, “2019 लोकसभा निवडणुकीत आम्ही ज्या मतदारसंघात जिंकलो आहे. त्या मतदारसंघात आम्ही तर लक्ष देणारच आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत नव्याने जे मतदारसंघ जिंकायचे आहेत. त्या 16 मतदारसंघ व्यक्तरिक्त 8 मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने बुलढाणा, चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुर, हातकानंगले मतदार संघावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.”
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना ईडीने केलेल्या कारवाईविरोधात काँग्रेसचे कार्यक्रर्ते देशभरात आंदोलन सुरू आहे. यावर फडणवीस म्हणाले, “राहुल गांधींना ईडीने चौकशीसाठी बोलवल्यानंतर आंदोलन करणे चुकीचे असून ईडीच्या चौकशीदरम्यान तपास यंत्रणेवर दबाव आणण्यासाठी काँग्रेस आंदोलनाच्या माध्यमांतून करत आहे,.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.