HW Marathi
राजकारण

भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना गडकरींचा घरचा आहेर

नागपूर |  भाजप कार्यकर्त्यांचे वर्तन हे खरोखरीच अटलजींना अपेक्षित वर्तन आणि विचारांसारखे आहे का? असा प्रश्न विचारत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांना घरचा आहेर दिला आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि नेते हे ‘माझ्या गळ्यात लहान हार का घातला ह्यापासून मला फक्त चहाच का दिला, बिस्कीट का नाही?’ अशा कोणत्याही क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालत असतात असेही त्यांनी सुनावले.

भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांच्या संकुचित मनाने अटलजींच्या विचारांवर आपल्याला कसे काय चालता येईल असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित कार्यकर्ते आणि नेतेमंडळींना विचारला. अटलजींसारखे आपण खरोखरच आहोत का याचा कार्यकर्त्यांनी विचार करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी करीकर्त्यांना दिला. नागपुरात दिवंगत पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.

Related posts

राहुल गांधी आज वायनाड दौऱ्यावर

News Desk

राजीव गांधी यांच्या भारतरत्नवरुन आप’मध्ये वाद

News Desk

तासगाव नगरपालिकेसमोर भर पावसात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे उपोषण

News Desk