मुंबई | “सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट (Narco Test) करा”, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनाचे आज (22 डिसेंबर) कामकाज सुरू झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणी राहुल शेवाळेंच्या आरोपांचा पुनरच्चार करत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) नार्को टेस्टची मागणी केली आहे.
नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा. जसे आता श्रद्धा वालकरच्या केसमध्ये आफताबची नार्को टेस्ट झाली आणि सत्य बाहेर आले. तसेच एकदा आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा. म्हणजे A ऑफर आफताप आणि A ऑफर आदित्य म्हणजे सगळ्या विकृतीचे नाव आता एक समाना झालेले आता दिसत आहे. म्हणून एकदा आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा. आणि सुशांत सिंग आणि दिशा शालियानसंदर्भात सत्य बाहेर येऊ दे. दिशा सालियानची केस आज पण मुंबई पोलिसांकडे आहे. ही केस सीबीआयकडे नाही आहे. सीबीआयने फक्त सुशांत सिंग राजपूतची केसचा तपास करत आहेत.”
दिशा सालियांची केस पुन्हा ओपन करा
“मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रांना सांगतोय की, दिशा सालियानची केस ही आज मुंबई पोलिसांकडे आहे. ती कृपया करून आपण पुन्हा फाईल ओपन करा. त्याची परत चौकशी करा. नेमके 8 आणि 9 जूनच्या रात्री काय झाले?. कशामुळे सुशांत सिंग हत्या करण्यात आली?, या प्रकरणात रिया चक्रवर्तीची यात किती सहभाग आहे?, दिशा सालियानच्या केसमध्ये दोन वेळा आयो का बदलला गेला?, सुशांत आणि दिशा या दोघांची सीसीफुटेज आजही का गायब केले गेले? आजही दिशा सालियानचा शवविच्छेदन रिपोर्ट बाहेर आलेला नाही?, जर दिशाने खर आत्महत्या केली होती?, मग ऐवढ्या सर्व गोष्टी का लपविल्या जात आहेत?. म्हणून एकदाच आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी. कारण आताच सगळे जण बोलयाला लागलेत,” असे अनेक प्रश्न नितेश राणेंनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केले आहे.
सुशांत आणि दिशा यांच्या मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव येते
नितेश राणे म्हणाले, “जेव्हापासून सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान या दोघांची मृत्यू झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. महाराष्ट्रात ऐवढे राजकारणी लोक आहेत. जेव्हा जेव्हा सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यू प्रश्न येतो. फक्त तेव्हाच आदित्य ठाकरेंचे नाव का काढले जाते?, दुसऱ्या राजकारणाचे नाव का घेतले जात नाही?, का उल्लेख करत नाही?, दुसरे राजकारणी महाराष्ट्रात नाही. म्हणजे कुठेना कुठे तरी ‘दाल में कुछ काला है’. म्हणून तर एकाच माणसाचे सतत नाव घेतले जाते,” असा सवाल त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.