HW News Marathi
राजकारण

“मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर…”, संजय राऊतांचा शिंदे गटाला खोचक टोला

मुंबई | “मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर तो माझा सन्मान असल्याचे मी समजतो”, असा पलटवार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह शिंदे गटाला लगावला आहे. राऊतांनी शुक्रवारी (2 डिसेंबर) नाशिक दौऱ्यादरम्यान पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर टीका केली. यानंतर राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली. या पार्श्वभूमीवर राऊतांनी माध्यमांशी बोलताना शिंदे गटाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाला आज (3 डिसेंबर) टोला मारला.

 

राऊत म्हणाले, “मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर तो माझा सन्मान असल्याचे मी समजतो. ते जर उत्तम शिव्या देता येत असतील, तर त्यांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपचे राज्यपाल, राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री द्यावात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळूू. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्यांना शिव्या द्या. महाराष्ट्र तुमच्या शिव्यांचे कौतुक करेल,” असे आव्हान राऊतांनी शिंदे गटाला केले आहे.

 

संजय राऊत नेमके काय म्हणाले

 

राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहे.राऊतांनी नाशिकमध्ये 2 डिसेंबर शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेतून भाजप आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. राऊत म्हणाले,  “मी गद्दार किंवा खोकेवाले आमदार यांच्यासाठी पत्रकार परिषद नाही घेतली. यांच्या कपाळावर गद्दारीचा शिक्का बसलेला आहे. जसे ‘दिवार’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, यावेळी उपस्थितांमध्ये हशा पिकला. राऊत पुढ म्हणाले, “‘दिवार’ सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या अमिताभ बच्चन यांच्या हातावर गोंदले होते ‘मेरा बाप चोर है’. तस यांचे नातेवाईक, यांची पोरे, यांच्या बायका उद्या लोक म्हणतील. हे गद्दार आहे. यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. यांच्या पिढ्यानपिढ्यांना ही गद्दारी आता त्यांना शांतपणे जगू देणार नाही.”

 

राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर संजय गायकवाड जीभ घसरली

 

राऊतांनी केलेल्या टीकेवर गायकवाड प्रत्युत्तर देताना माध्यमांशी बोलताना त्यांची जीभ घसरली. गायकवाडांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गायकवाड म्हणाले, “आमच्यावर गद्दाराचा आरोप नाही लागणार आहे. आमच्यावर उठावाची क्रांती केल्याचा अभिमान आमच्या पुढच्या पिढ्यांना लागणार आहे. त्यामुळे **** संजय राऊत तू यानंतर अशी भाषा वापरू नको. आम्ही पडायचे की लढायचे, तर जनतेला आमचा निर्णय मान्य आहे. तुम्ही जी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. ती जनतेला मान्य नाही. आम्हाला शिवसेना-भाजप म्हणून लोकांनी निवडून दिले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना म्हणून नाही. त्यामुळे अमिताभ बच्चनचा डायलॉग मारून तो पिचर पुरता ठिक आहे.  प्रॅक्टिकल जिवनात तू जेव्हा पाहशील आम्ही दाखवू आमच्या किती जागा महाराष्ट्रात येतात”, असे म्हणाले.

Related posts

फैजपूर येथे ४ ऑक्टोबरला काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा

News Desk

शेतकरी प्रश्नावरुन भाजपा सरकारवर ठाकरेंचे टीकास्त्र

News Desk

शिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका

News Desk